Paneer Paratha Recipe : सोशल मीडियावर नवनवीन रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही रेसिपीचे व्हिडीओ खूप हटके असतात. तुम्हाला पनीरपासून तयार केलेले पदार्थ आवडतात का? पनीर पुलाव, पनीरची भाजी, पालक पनीर, मिक्स पनीर वेज इत्यादी. पदार्थ आपण दररोज खातो. पण तुम्ही पनीर पराठी घरी तयार करून खाल्ला आहे का? हिवाळ्यात गरमा गरम पराठा खायला सर्वांना आवडतो. पनीर पराठी खायचा असेल तर आपण अनेकदा बाहेर खायला जातो पण आज आपण घरच्या घरी पनीर पराठा कसा तयार करायचा, हे जाणून घेणार आहोत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पनीर पराठ्याची अगदी सोपी रेसिपी सांगितली आहे. (Paneer Paratha Recipe How to make Paneer paratha video goes Viral on social Media)
या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे – ((Paneer Paratha Recipe Video)
साहित्य
- पनीर
- कोथिंबीर
- धनेपूड
- जिरेपूड
- चिली फ्लेक्स
- ओवा
- मीठ
- गव्हाचे पीठ
- तूप
कृती
- सुरुवातीला पनीरचे बारीक तुकडे करा.
- त्यानंतर त्या पनीरच्या तुकड्यांमध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका
- त्यानंतर त्यात धनेपूड, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, ओवा आणि चवीनुसार मीठ टाका.
- सर्व मिश्रण एकजीव करा आणि हाताने सर्व गोष्टी कुस्कुरून घ्या आणि याचे बारीक मिश्रण करा.
- त्यानंतर गव्हाचे पीठ मळून घ्या आणि त्याचा गोळा करून जाडसर पोळी लाटून घ्या.
- त्यानंतर हे पनीरचे मिश्रण त्या पोळीवर टाकून पोळी चारही बाजून पॅक करा. त्यानंतर चौकोन आकाराचा पराठा लाटून घ्या. तुपाने दोन्ही बाजूने पराठा तव्यावर भाजून घ्या.
- हा गरमा गरम पनीर पराठा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
namaste_nibbles या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पनीर पराठा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला खूप आवडतो.” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम.. मी नक्की ट्राय करेन.. खूप सोपी आहे..” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप चविष्ठ आहे अनेकांना ही चविष्ठ रेसिपी आवडली आहे..