Paneer Paratha : पराठा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. सहसा लोकं घरी आलू पराठा, कांदा पराठा, कोबी पराठा, मेथी पराठा आवडीने बनवून खातात पण तुम्ही कधी पनीर पराठा खाल्ला आहे का?
पनीर पराठा हा अत्यंत पौष्टिक आणि तितकाच स्वादिष्ट असतो. प्रोटिनयुक्त पनीर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. अनेक आहारतज्ज्ञ पनीर खाण्याचा सल्ला देतात.
तुम्ही जर हेल्दी ब्रेकफास्टचा विचार करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. घरच्या घरी पनीर पराठा कसा बनवायचा, चला तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

पनीर
गव्हाचे पीठ
लाल तिखट
हिरवी मिरच्यांची पेस्ट
बारीक चिरलेला कांदा
आले
कोथिंबीर
धनेपूड
जिरेपूड
हळद
तेल
तूप
लिंबूचा रस
मीठ

हेही वाचा : Masala Dal : 10 मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मसाला डाळ, लगेच रेसिपी नोट करा

कृती:

सुरुवातीला पनीर बारीक किसून घ्यावे
त्यात लाल तिखट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, हळद, मीठ टाकावे
बारीक चिरलेला कांदा त्यात टाकावा
धनेपूड, जिरेपूड आणि लिंबाचा रस त्यात टाकावा.
वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी
सर्व मिश्रण एकत्र करावे.
गव्हाचे पीठ पाण्याने भिजवावे त्यात चवीनुसार मीठ टाकावे.
कणिक चांगल्याने मळून घ्यावी
पोळी लाटल्यानंतर त्यात वरील मिश्रण भरावे आणि त्याचा गोळा करावा
हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा
गरम तव्यावर तूप किंवा तेल सोडून पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यावा.
तुमच्या आवडत्या चटणीबरोबर तुम्ही हा पराठा खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paneer paratha recipe how to make tasty paneer paratha healthy breakfast healthy food ndj
Show comments