Paneer Popcorn Recipe: पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्या असतील. त्यात पनीर टिक्का, पनीर क्रिस्पी, पनीर टिक्का अशा रेसिपी अनेकदा घरीही आपण बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी ‘पनीर पॉपकॉर्न’ची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कशी बनते ही रेसिपी.

साहित्य

पनीर

Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी
Crispy Corn Recipe easy corn recipe for snacks
Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी
Couple kissing at railway station couple video viral on social media
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ‘चीज बॉल्स’, लहान मुलंही होतील खुश; वाचा सोपी रेसिपी
Paneer malai kofta recipe easy paneer recipe video
१०० ग्रॅम पनीरपासून बनवा घरच्या घरी ‘पनीर मलाई कोफ्ता’, रेस्टॉरंटची चव विसरून जाल
potato lifafa recipe
बटाट्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग ‘पोटॅटो लिफाफा’ एकदा करून पाहाच, लगेच लिहून घ्या रेसिपी

१/२ टिस्पून काश्मिरी लाल मिरची

१/२ टिस्पून मीठ

१/२ टिस्पून हळद

१/२ टिस्पून गरम मसाला

कॉर्नफ्लेक्स

स्लरीसाठीचं साहित्य

२ टिस्पून कॉर्नफ्लोर

१/४ टिस्पून काश्मिरी लाल मिरची

१/४ टिस्पून मीठ

१/४ टिस्पून गरम मसाला

केचप किंवा चटणी

हेही वाचा… एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

कृती

  1. पनीरचे छोटे तुकडे करा.
  2. एका भांड्यात पनीरचे तुकडे घ्या आणि त्यात १/२ टिस्पून काश्मिरी लाल मिरची, १/२ टिस्पून मीठ, १/२ टिस्पून हळद आणि १/२ टिस्पून गरम मसाला घाला.
  3. सर्व मसाल्यांसोबत पनीर मॅरेनेट करा.
  4. पनीरचे तुकडे २०० डिग्रीवर १२ मिनिटे ग्रिल करा.
  5. २ टिस्पून कॉर्नफ्लोर, १/४ टिस्पून काश्मिरी लाल मिरची, १/४ टिस्पून मीठ आणि १/४ टिस्पून गरम मसाला वापरून एक स्लरी तयार करा.
  6. पनीरचे तुकडे स्लीरी मध्ये बुडवा.
  7. त्यांना कॉर्नफ्लेक्सने कोट करा.
  8. १८५ डिग्रीवर १२ मिनिटे एअर फ्राय करा.
  9. तुमचे क्रिस्पी पनीर पॉपकॉर्न तयार आहे. ते गरम गरम केचप किंवा चटणीसोबत सर्व करा.

हेही वाचा… नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

पाहा VIDEO

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader