Paneer Schezwan Dry Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी स्टार्टर्सची पनीरची रेसिपी जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे ‘पनीर शेजवान ड्राय’.
हेही वाचा… Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
साहित्य
- 250 ग्राम पनीर (कापलेले)
- 2 बारीक चिरलेला कांदा
- 1 चमचा लाल तिखट पावडर
- 1 चमचा मिरी पावडर
- चवीनुसार मीठ
- 3 चमचे चिंग्स शेजवान चटणी / सॉस
- 2 चमचे मैदा आणि कॉर्नफ्लोर
- तळण्यासाठी तेल
कृती
- पनीरचे बारीक तुकडे करा. त्यात लाल तिखट पावडर, मिरी पावडर, मीठ, मैदा आणि कॉर्नफ्लोर घाला. सर्व साहित्य नीट एकत्र करा जेणेकरून पनीरचे तुकडे पूर्णपणे कोट होतील.
- तळण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यात पनीरचे तुकडे हळू हळू टाका आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
- दुसऱ्या कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेले कांदे टाका आणि ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. आता त्यात चिंग्स शेजवान चटणी / सॉस घाला आणि तळलेले पनीरचे तुकडे टाका. सर्व मिश्रण छान हलवून पनीर चांगले सॉसने कोट करा. आवश्यक असल्यास मीठ घाला.
- कांद्याची पात किंवा कोथिंबीर टाकून सजवा.
- गरमागरम सर्व करा, हे स्टार्टर्स किंवा साइड डिश म्हणून भात किंवा नूडल्स सोबत सर्व करता येईल.