Paneer special Korma: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नेमकं स्पेशल असं काय बनवायचं प्रश्न अनेकदा पडतो. आज आपण एक खास पदार्थ पाहणार आहोत ज्याचं नाव ऐकताच नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल . ज्याचे नाव आहे ‘’स्पेशल कोरमा’ . तर ‘पनीर स्पेशल कोरमा रेसिपी’ नक्की कशी बनवायची आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी झटपण पण झणझणीत आणि चविष्ट कशी होईल हे आपण आज जाणून घेणार आहोत.
साहित्य
२ चिरलेले कांदे
१ बाऊल दही
काजू
पनीर
तेल
खडे मसाले
आलं-लसूण पेस्ट
टोमॅटो प्युरी
मीठ
काश्मिरी लाल मिरची
हळद
गरम मसाला
धणे पावडर
हिरवी मिरची
कोथिंबीर
हेही वाचा… ‘गाजर बर्फी’ खाल तर बाकी मिठाई विसराल! घरच्या घरी झटपट बनवा अन् रेसिपी लगेच लिहून घ्या
- एका पातेल्यात २ चिरलेले कांदे घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
- एका मिक्सरमध्ये भाजलेले कांदे, १ बाऊल दही आणि काही काजू घाला.
- सर्व घटक चांगले एकत्र करून घ्या.
- त्यानंतर पनीर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
- एका पातेल्यात २ चमचे तेल घाला, काही खडे मसाले, आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो प्युरी घाला. २ मिनिटे शिजवा.
- आता त्यावर अर्धा चमचा मीठ, १ चमचा काश्मिरी लाल मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर घाला. चांगले परतून घ्या.
- कांदा, दही आणि काजू पेस्ट घाला आणि चांगले शिजवा.
- ग्रेवी अगदी घट्ट होऊ नये म्हणून थोडे पाणी घाला.
- भाजलेले पनीर तुकडे, चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.
- तुमचा पनीरचा स्पेशल कोरमा तयार आहे. आनंद घ्या!
हेही वाचा… नवीन वर्षाच्या आधी बटाट्याचा ‘हा’ पदार्थ नक्कीच करून पाहा, चव कायम राहील लक्षात!
ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd