Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi: दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नेमकं स्पेशल असं काय बनवायचं प्रश्न अनेकदा पडतो. तेव्हा आई झटपट अंड्याचं ऑमलेट किंवा भुर्जी बनवते. पण सतत अंड्याचं ऑमलेट, अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा येतो. अनेकदा मच्छी खायचं मन करतं पण तेवढा लवाजमा कोण करणार म्हणून अनेकजण फिश रेसिपी ट्रायच करत नाहीत.

म्हणूनच आज आपण एक खास पदार्थ पाहणार आहोत ज्याचं नाव ऐकताच नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल . ज्याचे नाव आहे ‘पापलेट फ्राय’ . तर ‘पापलेट फ्राय’ नक्की कसं बनवायचं आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी झटपण पण झणझणीत आणि चविष्ट कशी होईल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • 2 टेबलस्पून ज्वारी पीठ
  • 1 टेबलस्पून रवा बारीक
  • 1/8 टीस्पून हळद
  • 1/4 टीस्पून लाल तिखट
  • 1/8 टीस्पून मीरे पूड
  • मीठ चवीनुसार
  • मॅरीनेशन्
  • 5 हिरव्या मिरच्या (तिखट)
  • 10 ते 15 लसूण पाकळ्या
  • 1/2 ” इंच आले
  • 1 मूठ कोथिंबीर
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1 लिंबू रस
  • मीठ चवीनुसार

कृती

लसुण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले, मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

एका वाटीत काडून घ्या, त्यात हळद, मीठ चवीनुसार, लिंबू रस घालून घ्या.

पापलेट स्वच्छ धुवून घ्या. पापलेट मीठ आणि हळदी च्या पाण्याने धून घ्या.

आता तयार वाटण पापलेटला लावून घ्या. त्याचे वरचे छेद तसेच पॉकेट मध्ये वाटण भरून घ्या. दोन्ही बाजूने लावून घ्या. 30 मिनिटे झाकून ठेवा.

ज्वारी पीठ, रवा, मीठ, हळद, लाल तिखट, मिरे पूड घालून मिक्स करून घ्या.

तवा तापवत ठेवा. नंतर त्यावर तेल घालावे. पापलेट पिठाच्या मिश्रणात घोळवून तव्यावर घाला. खालची बाजू भाजली गेली की ती बाजू उलटून घ्या. कुरकुरीत होई पर्यंत भाजून घ्या.

कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा.