Biscuit Gulab Jamun Recipe : असं क्वचितच कोणी असेल की ज्याला पार्ले जी बिस्किट माहिती नाही. लहानपणापासून आपण पार्ले जी बिस्किट खाल्ले आहे पण तुम्ही कधी पार्ले बिस्किटचे गुलाबजाम बनवले आहे का? होय, गुलाबजाम. पार्ले बिस्किटपासून अप्रतिम असे गुलाबजाम तयार करण्यात येतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला बिस्किटांपासून स्वादिष्ट असे गुलाबजाम तयार करताना दिसते. सध्या हा रेसिपीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पार्ले बिस्किटचे गुलाबजाम
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला पार्ले बिस्किटांपासून गुलाबजाम कसे तयार करायचे, याविषयी सांगतात.
- सुरुवातीला त्या चार पाकिटे बिस्किट घेतात
- त्यानंतर हे बिस्टिके पाट्यावर बारीक वाटून घेतात.
- बारीक केलेले बिस्किट प्लेटमध्ये काढून घेतात. (तुम्ही मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता)
- बारीक केलेल्या बिस्किटांमध्ये त्यानंतर त्या दूध टाकून पीठ मळून घेतात
- घट्ट पीठ मळून झाल्यानंतर त्या पेटत्या चुलीवर कढई ठेवतात आणि त्यात एक वाटी साखर टाकतात. त्यानंतर त्या साखरेत अर्धा वाटी पाणी टाकतात आणि घट्ट असा पाक तयार करतात.
- त्यानंतर त्यात त्या वेलची टाकतात.
- साखरेचा पाक तयार झाल्यानंतर मळलेल्या पिठापासून गुलाबजामचे गोळे करा.
- आणि हे गोळे मंद आचेवर तेलातून तळून घ्या.
- तळलेले गुलाब जाम साखरेच्या पाकात टाका.
- पार्ले बिस्किटांपासून गुलाबजाम तयार होतील.
पाहा व्हायरल व्हिडीओ
apalimavashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आपल्या मावशीच्या हाताने बनवलेले बिस्कीटचे गुलाबजामुन”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पण बनवून बघते गुलाम जामुन मावशी, खरच भारी दिसतेय बघायला तरी” तर एका युजरने लिहिलेय, “वाह अस्सल गावरान. चुलीवरचे गुलाबजामुन” आणखी एका युजरने लिहिलेय, “मावशी तुमच्या प्रत्येक रेसिपी छान असतात.”
या महिला ‘आपली मावशी’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन रेसिपीचे व्हिडीओ शेअर करताना दिसून येतात. त्यांचे युट्यूब अकाउंटसुद्धा आहे. हजारो लोक त्यांना फॉलो करतात. त्यांचे व्हिडीओ लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात.