उरलेल्या किंवा रात्रीच्या शिळ्या भाज्या खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो. मग त्यांचा काही तरी झटपट आणि चटपटीत नाश्ता बनवला तर मात्र तो पटकन संपतो. असाच एक पदार्थ
साहित्य – उरलेली कोणतीही सुकी भाजी (मेथी, पालक, भेंडी, बटाटा अगदी कोणतीही. पण रसदार भाजी नको.) माणशी एक अंडे, मीठ, मिरपूड, दूध, लाल तिखट, सॉस, ब्रेड
आणखी वाचा
कृती- जाड बुडाच्या खोलगट तव्यावर नीट तूप लावून घ्या. आता यावर उरलेली भाजी व्यवस्थित पसरून घ्या. दुसरीकडे अंडे फोडून फेटून घ्या. ते तव्यावरच्या भाजीवर टाका. त्यावर मीठ, मिरपूड, लाल तिखट, सॉस घाला. आता या ऑम्लेटला निवांत शिजू द्या. साधारण पंधरा मिनिटांनंतर ते मस्त गुबगुबीत शिजून तयार होते. त्याचे त्रिकोणी तुकडे करून ब्रेडमध्ये भरून खायला घ्या. ब्रेड नको असेल तर नुसतेच खा.