साहित्य : तांदळाचे पीठ, पाणी, ओल्या नारळाचा किस, गूळ एक प्रत्येकी एक वाटी, हळदीची पाने, वेलची पूड, मीठ आणि तूप.
कृती : ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलची एकत्र शिजवून मोदकात घालतात तसे सारण करून घ्या.
आणखी वाचा
- सारण शिजेपर्यंत पाणी उकळवून घ्या. त्यात तूप आणि मीठ टाका. उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ टाकून उकड काढून घ्या.
- उकड थोडीशी थंड झाल्यावर ती व्यवस्थित माळून घ्या.
- हळदीच्या पानाला थोडे तूप किंवा पाणी लावून त्यावर उकडीचा पातळ थर पसरवा.
- पानाच्या एका बाजूवर सारण पसरवा आणि पान दुमडून ठेवा.
- सर्व पाने तयार झाल्यावर मोदक उकडतात त्याप्रमाणे उकडवून घ्या.
- गरम गरम पातोळ्यांवर तूप घालून वाढा.