पावभाजीची मसालेदार चव कोणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावभाजीची चव सर्वांनाच आवडते. अनेक भाज्या एकत्र करून ते बनवले जाते. गरमागरम पाव सोबत खाण्याची एक वेगळीच मजा आहे. दरम्यान ही पावभाजी बनवण्यासाठी बहुतेक महिला या बाहेरुन पावभाजी मसाला विकत आणतात. मात्र आता असं न करता अवघ्या २५ मिनिटांत घरच्या घरी आणि ६ महिने टिकणारा पावभाजी मसाला तयार करा. आम्ही तुमच्यासाठी याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. मार्केट सारखा परफेक्ट पावभाजी मसाला आता घरीच…
पावभाजी मसाला साहित्य –
- धणे – ८ चमचे (२५ ग्रॅम)
- जिरे – २ चमचे (१५ ग्रॅम)
- बडीशेप – २ चमचे (१० ग्रॅम)
- लाल मिरची – २० संपूर्ण (२० ग्रॅम)
- मोठी वेलची – १० (१० ग्रॅम)
- दालचिनी – ४-५ तुकडे (5 ग्रॅम)
- काळी मिरी – १ टीस्पून (५ ग्राम)
- लवंग – १ टीस्पून (३ ग्राम)
- आले पावडर – १ टेबलस्पून (१० ग्राम)
- सुकी आंबा पावडर – १.५ चमचे (१५ ग्रॅम)
- काळे मीठ – १ टेबलस्पून (१५ ग्राम)
- डाळिंबाचे दाणे – १ टेबलस्पून (५ ग्राम)
- जायफळ – १ (४ ग्रॅम)
- हळद पावडर – १ टेबलस्पून (१० ग्राम)
- ओवा – १ टीस्पून (३ ग्रॅम)
पावभाजी मसाला कृती –
- कढईत संपूर्ण धणे, जिरे, बडीशेप, लाल मिरची, काळी वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंगा, डाळिंबाचे दाणे घालून मंद आचेवर १-२ मिनिटे हलके तळून घ्या.
- नंतर वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या आणि थंड होऊद्या.
- सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बारीक करताना ताबडतोब बरणी उघडू नका, मसाले उडू शकतात. आता बारीक केलेले मसाले चाळून घ्या.
- भरड मसाले पुन्हा बारीक करून मिक्स करा.
हेही वाचा >> खान्देशी पद्धतीची चटकदार झणझणीत हिरव्या वाटणातील मसाला वांगी; एकदा खाल तर खातच रहाल!
- अशाप्रकारे आपला पावभाजी मसाला पावडर तयार आहे, मसाला हवाबंद डब्यात ठेवा आणि ६ महिने वापरा.