Peruchi Bhaji : पेरू हे असे फळ आहे जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. पेरू जितके पौष्टिक आहे तिकतेच स्वादिष्ट सुद्धा वाटते. त्यामुळे पेरू आंबट असो किंवा गोड, आपण आवडीने खातो.
पेरू खाल्यानंतर सर्दी खोकला होईल, या भीतीने अनेक जण पेरू खाणे टाळतात पण आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पेरूचा आस्वाद सुद्धा घ्याल आणि तुम्हाला सर्दी खोकला सुद्धा होणार नाही. तुम्ही पेरूची भाजी बनवू शकता.तुम्ही कधी पेरूची भाजी खाल्ली आहे का? हो, खूप कमी लोकांना माहिती आहे की पेरूची सुद्धा खूप चविष्ठ भाजी बनवता येते. ही भाजी कशी बनवायची, त्यासाठी तुम्हाला ही सोपी रेसिपी जाणून घ्यावी लागेल. ही भाजी तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये बनवू शकता. ही भाजी चवीला अप्रतिम वाटते तुम्ही लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत कुणालाही ही भाजी खाऊ घालू शकता.

साहित्य

  • पेरू
  • तेल
  • मोहरी
  • मेथी दाणे
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • हिंग
  • पेरू
  • लाल तिखट
  • मीठ
  • लिंबू
  • काळा मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : Anda Bhaji :अंडा भजी कधी खाल्ली का? फक्त दहा मिनिटांमध्ये अशी बनवा ही अंडा भजी, जाणून घ्या रेसिपी

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
matar kachori recipe in marathi
कुरकुरीत खायची इच्छा होतेय? मग लगेच बनवा ‘मटार कचोरी’, सोपी रेसिपी लिहून घ्या
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Masale Bhaat Recipe
Masale Bhaat Recipe : घरीच बनवा लग्नसमारंभात बनवला जाणारा मसाले भात, अगदी सोपी आहे रेसिपी, पाहा VIDEO

कृती

  • सुरुवातीला पेरू स्वच्छ धुवून घ्या
  • पेरू बारीक चिरून फोडी तयार करा
  • त्यानंतर एका कढईत तेल घ्या.
  • तेल चांगले गरम झाले की त्यात मोहरी टाका
  • त्यानंतर त्यात मेथी दाणे, हिरवी मिरची आणि थोडी हिंग घाला.
  • पेरूच्या थोड्या फोडी त्यात घाला. थोड्या बाजूला काढून ठेवा
  • त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर बाजूला ठेवलेल्या पेरुच्या फोडी त्यात घाला.
  • मंद आचेवर थोडा वेळ शिजवून घ्या
  • त्यानंतर त्यात थोडे पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवून पुन्हा शिजवा
  • शेवटी त्यावर लिंबू पिळून घ्या.
  • आणि थोडा वेळ शिजू द्या
  • त्यानंतर पुन्हा त्यात वरुन काळा मसाला टाका
  • आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • तुमची पेरूची भाजी तयार होईल.

Story img Loader