सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना गरम गरम काहीतरी खावसं वाटतं. अनेकदा आपण गरमा गरम भजी करतो पण आज आम्ही तुम्हाला हटके आणि बेस्ट ऑप्शन सांगणार आहोत. तुम्ही आतापर्यंत साधा समोसा खाल्ला असेल आज बनवा फुलकोबी समोसा, चला तर जाणून घेऊयात, कसा बनवायचा झटपट फुलकोबी समोसा
फुलकोबी समोसा साहित्य
- फुलकोबी
- मैदा, तुप
- चवीनुसार मीठ, बटाटे
- तेल, हिरवी मिरची
- हिंग, शेंगदाणे
फुलकोबी समोसा कृती
- बंगाली स्टाइल फुलकोबी समोसा बनवण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात मैदा, तूप, मीठ आणि साखर घालून पीठ चांगले मळून घ्यावे. आता हे पीठ ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर फुलकोबी आणि बटाटे लहान चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवावे.
- नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात लाल मिरच्या, हिंग, हिरवी मिरची, शेंगदाणे घालून सर्व काही नीट मिक्स करून घ्या. नंतर कोबी आणि बटाटे सोबत मीठ आणि साखर घालून एकत्र शिजवा. आता कढईत मसाला घाला आणि सर्व गोष्टी पदार्थ मिक्स करा.
हेही वाचा – Crispy Potato: पावसाळ्यात नाष्ट्याला बनवा क्रिस्पी पोटॅटो स्नॅक्स; १० मिनिटांत तयार होते ही सोपी रेसिपी
- यानंतर पिठाचा एक भाग काढून त्याचा शंकूचा आकार द्यावा. त्यात तयार केलेले बटाट्याचे सारण भरून कडा बंद करा आणि समोसे सोनेरी होईपर्यंत तळावे. तुमचा चविष्ट बंगाली फुलकोबी समोसा तयार आहे. हे गरमा गरम समोसे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत सर्व्ह करू शकता.