Poha Chat Recipe : भेळ हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तुम्ही आजवर अनेक प्रकारची भेळ खाल्ली असेल. सहसा आपण भेळ ही घरी बनवण्यापेक्षा बाहेर खातो. पण घरी बनवलेली भेळ ही अधिक चविष्ठ वाटते. तुम्ही अनेकदा चुरमुरे किंवा मुरमुऱ्यांपासून बनवलेली भेळ खाल्ली असेल आणि
सहसा आपण भेळ ही मुरमुरे किंवा चुरमुरेपासून बनवतो पण तुम्ही कधी पोह्यांपासून बनवलेली भेळ खाल्ली आहे का? हो, पोह्यांपासून बनवलेली भेळ. ही भेळ अत्यंत स्वादिष्ट आणि तितकीच पौष्टिक आहे.ही भेळ बनवायला सुद्धा खूप वेळ जात नाही. अनेकदा मुलांना दुपारी किंवा सायंकाळी चार नंतर भूक लागते.अशावेळी त्यांना हलके फुलके खायला काय द्यावे, हा खूप मोठा प्रश्न असतो अशावेळी तुम्ही दुपारच्या नाश्त्याला ही भेळ बनवू शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. यालाच भेळ पोहे असे सुद्धा म्हणतात. हे भेळ पोहे कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. ही रेसिपी लगेच नोट करा आणि ही झटपट ही भेळ बनवा.
साहित्य
पातळ पोहे
तूप
हिंग
जिरे
शेव
खारे शेंगदाणे
बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक किसलेले खोबरे
साखर
लिंबू
मीठ
हेही वाचा : Ukadpendi Recipe : नाश्त्याला बनवा गव्हाच्या पिठाची पौष्टिक आणि चविष्ट उकरपेंडी, ही सोपी रेसिपी जाणून घ्या
कृती
एका कढईत तूप गरम करा.
त्यात हिंग आणि जिरे घालून फोडणी द्या
त्यात नंतर पातळ पोहे टाका आणि चांगले परतून घ्या.
पोहे कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्या.
त्यानंतर भाजलेल्या पोह्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकावा.
त्यात खारे शेंगदाणे टाकावे.
बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक किसलेले खोबरे त्यात घालावे.
चवीनुसार थोडे लाल तिखट आणि मीठ घालावे.
लिंबाचा रस पिळून घ्यावा आणि चवीनुसार थोडी साखर टाकावी
सर्व मिश्रण एकत्र करावे.
त्यात वरुन शेव टाकावे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
भेळ पोहे तयार होईल.
तुम्ही हे भेळ पोहे सर्व्ह करू शकता.