शुभा प्रभू साटम

साहित्य :

जाड पोहे, उकडलेले बटाटे, आले-मिरची पेस्ट, गरम मसाला, तिखट, मीठ, आवडीच्या भाज्या आणि रवा.

कृती :

पोहे धुऊन भिजवून कुस्करून घ्यावेत. त्यात उकडलेला बटाटासुद्धा कुस्करून घालावा. ज्या भाज्या आवडत असतील त्या थोडय़ाशा वाफवून आणि बारीक चिरून घ्याव्यात. यामध्ये चवीनुसार मीठ, आले-मिरची पेस्ट, गरम मसाला, तिखट, मीठ घालून घ्यावेत. यामध्ये तुम्ही आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता. आवडत असल्यास किंचित साखरही घाला. आता याचे गोळे तयार करून ते रव्यामध्ये घोळवावेत आणि तव्यावर मस्त लालसर भाजून घ्यावेत.

Story img Loader