valvan recipes in marathi आमटी भात असो किंवा खिचडी त्याच्यासोबत काहीतरी तोंडी लावायला असेल की आपल्याला फार बरे वाटते. यामध्ये लोणचं, चटणी, सॅलेड हे तर असेलच पण पापड, कुरडई, बॉबी असे काही कुरकुरीत असेल तर जेवण मस्त होते. उन्हाळा सुरु झाला की काही पदार्थ आपल्याला आठवतातच… त्यापैकीच एक म्हणजे कुरडई… उन्हाळ्यात एकदा कुरडई बनवली की वर्षभर टिकते. पण ही कुरडई बनवणं दिसतं तितकं सोपं नाही. त्यासाठी बरीच मेहनत लागते. मात्र सोप्या पद्धतीने कुरडई कशी बनवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी विशेष कष्ट किंवा वेळ लागत नसल्याने घरच्या घरी आपण ही रेसिपी नक्की ट्राय करु शकतो. पोह्याची कुरडई हा एक पारंपारिक खाद्य पदार्थ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टंट पोहा कुरडई साहित्य

१. १ किलो पोहे
२. चवीनुसार मीठ
३. आवश्यकतेनुसार पाणी
४. १/४ टीस्पून पापड खार
५. कुरडईचा साच्या

इन्स्टंट पोहा कुरडई कृती

१. दररोजच्या वापरातील पोह्यापासून तुम्ही कुरडई बनवू शकता. यासाठी तुम्हाला गहू भिजवण्याची वगैरे अजिबातच गरज नाही.कांदे पोहेसाठी वापरतो ते पोहे घ्या. पोहे एका भांड्यात घेऊन त्यात पाणी टाका. प्रथम पोहे घेऊन ते चाळून निवडून घ्यावे.

२. पोह्यात पाणी घालावे व ते पाच मिनिटं तसेच ठेवून द्यावे. नंतर पोहे चाळणीत काढून ठेवावे त्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते.

३. आता चाळणीतले पोहे एका ताटात किंवा परातीत काढावे व त्यात चवीनुसार मीठ व अगदी किंचित पापड खार घालावा. सर्व छान हाताने मळून घ्यावे व त्याचा गोळा बनवावा आवश्यकता असल्यास थोडे पाणी घालावे.

४. नंतर कुरडईचा साच्या घेऊन त्याला तेल लावावे व त्यात हा गोळा भरून कुरडई पाडून घ्यावी.

५. अशाच प्रकारे सर्व कुरडया पाडून त्या दोन तीन दिवस उन्हात वाळत टाकाव्या आता ऊन खूप आहे त्यामुळे दोन-तीन दिवसात वाळतात.

हेही वाचा >> फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती

६. कडक वाळल्या की डब्यात भरून ठेवाव्यात बारा महिने छान राहतात व जेव्हा हवे तेव्हा तळून खायला द्याव्यात.

७. नंतर दुसऱ्या दिवशी ही कुरडई तेलात तळू शकता. कुरडईमुळे साध्या जेवणाला देखील लज्जत येते. सणासुदीच्या जेवणात तर कुरडई लागतेच लागते. त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला जरूर कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pohe kurdai recipe in marathi news valvan recipes in marathi srk