शुभा प्रभू-साटम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

उरलेल्या पोळ्या, पिझ्झा सॉस, केचप, घरात शिल्लक असतील त्या भाज्या (पालक, मश्रुम, शिमला मिरची, कांदा पात, बेबी कॉर्न) असल्यास पनीर आणि अंडा बुर्जी, चीझ, फोडणीसाठी तेल, लसूण, मीठ, ड्राय हब्र्ज

कृती- वर दिलेल्या साहित्यातील सर्वच भाज्या आपल्या घरात असणे, बंधनकारक नाही. यापैकी ज्या असतील आणि आवडत असतील त्या छान बारीक चिरून लसणीच्या फोडणीवर थोडय़ाशा परतून घ्या. मीठ आणि ड्राय हब्र्जही त्यात घाला आणि शिजवून घ्या.

पोळीवर पिझ्झा सॉस लावा. पण पोळी फार ओली होणार नाही, याची काळजी घ्या. आता यावर शिजलेल्या भाज्या आणि अंडा बुर्जीचा थर लावा त्यावर चीझ किसून घाला. यावर पोळी लावा आणि त्यावर परत आधीप्रमाणे थर लावून घ्या. आता पोळीने ते बंद करा. असे हवे तितके थर लावून मग ही थरांची पोळी गॅसवर ठेवा. त्यावरच चीझ किसून घाला. मंद आचेवर चीझ वितळेपर्यंत पोळी छान शेकवून घ्या.  तुमच्याकडे जर चिकन असेल तर तेही अगदी बारीक चिरून आणि वाफवून यासोबत वापरू शकता. तुमचा स्टफ पिझ्झा तयार आहे. आता त्रिकोणी कापून खायला घ्या. तुम्ही अंडा बुर्जीऐवजी चिकनसुद्धा वापरू शकता, फक्त ते नीट साफ करून, वाफवून आणि बारीक तुकडे करून घ्या.