अद्वय सरदेसाई

साहित्य

३ मोठे चमचे डाळिंबाचे दाणे, २ लिंबे, पुदिन्याची १ जुडी, १ लिटर डाळिंबाचा रस, अर्धा लिटर लिंबूरस

कृती

डाळिंबाचे दाणे आइस क्यूबच्या ट्रेमध्ये घालून त्यावर प्रत्येक खळगा भरेपर्यंत पाणी भरावे आणि फ्रिज करावे. यामुळे मध्ये डाळिंब असलेला बर्फ तयार होईल. अर्ध्या पुदिन्याची पाने घेऊन ती कुस्करावीत त्यात लिंबू पिळून हे मिश्रण चांगले एकजीव करावे. डाळिंबाचा रस आणि लिंबू रस एकत्र करावा आणि त्यात लिंबू, पुदिन्याचे मिश्रण टाकावे. आता हे सगळे मिश्रण गाळून ग्लासमध्ये भरावे त्यात डाळिंबाच्या दाण्यांनी सजलेला बर्फ घालावा आणि लिंबाच्या चकत्यांनी ग्लास सजवावा.

Story img Loader