भारतीय ट्रेनमधून आपण कुठेही कोणत्याही भागात जाऊ शकतो. रेल्वेमुळे आपले ट्रॅवल सोपे होऊन जाते. ट्रेनमुळे आपण काही तासात आपलं डेस्टिनेशन गाठू शकतो. रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेकदा भूक लागते. आपण पाहिलंच असेल की, रेल्वेच्या डब्यांमध्ये रेल्वे कर्मचारी विविध पदार्थ विकण्यासाठी घेऊन येतात. ज्यात रेल्वे कटलेट हा पदार्थ फार फेमस आहे. रवा आणि पोहे या नेहमीच्याच पदार्थांपासून थोडासा वेगळा आणि तरीही पौष्टीक असा पदार्थ कसा करायचा पाहूया.
पाँक कटलेट साहित्य
- ३ उकडलेले बटाटे
- १ कोवळी ज्वारीचे हीरवे दाणे
- १/२ कप भिजलेले पोहे
- १ टीस्पून प्रमाणे हळदी पावडर,लाल मिरची पावडर,धना पावडर
- चवीनुसार मीठ
- १ टीस्पून लाल मिरचीची चटणी
- कांद्याची पात हिरव्या लसूण पातीचा ठेचा
- २-३ टेबलस्पून ब्रेडक्रम्स
- गरजेनुसार तेल
पाँक कटलेट कृती
सर्वात आधी हुरडा पॅन मधून भाजून घेऊ
नंतर मिक्सरमधून हुरडा दळून घेऊ. हिरव्या कांद्याची पात, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेऊ.
एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घेऊ . पोहे मिक्स करून घेऊ दळलेला हुरडा टाकून घेऊ.
आता त्यात हिरवा ठेचा, लाल मिरची चटणी ब्रेडक्रम्स, मीठ मसाले सगळे टाकून घेऊ.
व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घेऊ. हाताला थोडे तेल लावून चपटे कटलेट तयार करून घेऊ.
आता पॅन गरम करून त्यात थोडे तेल टाकून पॅनमध्ये कटलेट शालो फ्राय करून घेऊ. अशाप्रकारे तयार आहेत आपले पाँक कटलेट.