दीपा पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोपटी म्हणजे भारतीय बार्बेक्यू. रायगडच्या खाद्यसंस्कृतीतला एक आद्य प्रकार.

साहित्य – १ किलो चिकन, ५ अंडी, अर्धा किलो वालाच्या शेंगा, ३ चमचे लाल तिखट, १ चमचा चिकन मसाला, २ चमचे आले-लसूण-मिरचीचे वाटण, १ चमचा ओवा, ४ लहान बटाटे, ४ वांगी, २ चमचे लिंबूरस /दही, ४ चमचे तेल, १ चमचा गरम मसाला अर्धा कप खोवलेलं खोबरं, खडेमीठ, भांबुर्डीचा पाला.

कृती : शेंगा धुऊन घ्याव्यात. त्यांना हळद आणि ओवा लावावा. चिकन स्वच्छ धुऊन त्यालाही आले-लसूण-मिरचीचे वाटण, तिखट, चिकन मसाला, लिंबूरस आणि मीठ चोळावे. खोबऱ्यात तिखट, मीठ, गरम मसाला घालून चांगले मिश्रण करावे. आता बटाटे आणि वांग्याला काप देऊन त्यात खोबऱ्याचे हे मिश्रण भरावे.

पोपटी लावण्याची पद्धत – कुकरच्या भांडय़ाला आतून थोडे तेल चोळून घ्यावे. मग त्यावर पुढीलक्रमाने थर लावावे. शेंगा- खडे मीठ- चिकन – खडे मीठ – बटाटे, वांगी, अंडी – खडे मीठ – शेंगा – खडे मीठ.

प्रत्येक थर दिल्यानंतर खडे मिठाचा थर जरूर लावावा पण ते अति होणार नाही, याचीही आठवण ठेवावी. आता कुकरचे झाकण लावून मंद गॅसवर ७-८ शिट्टय़ा कराव्या. यानंतर शिट्टीची वाफ काढून गरमागरम पोपटी खाण्यास द्यावी.