Gudi Padwa 2024 : सण-उत्सव म्हटलं घरोघरी रुचकर पदार्थांचा बेत आखला जातोच. गुढीपाडव्याच्या दिवशीही घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थ तयार करा आणि आपल्या कुटुंबीयांसाठी या पदार्थांचा आस्वाद घ्या. या गुढीाडव्यानिमित्त खास बनवा डाळिंबीची उसळ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाळिंबीची उसळ हा पदार्थ महाराष्ट्रीन स्वयंपाकात नेहमी असतोच. कारण सणसुद असू दे अथवा घरातील लग्नकार्य पंगतीच्या जेवणात डाळिंबी उसळ असायलाच हवी. काहीजण या भाजीला बिरडं अथवा वालाची भाजी असं म्हणतात. डाळिंब्यांची उसळ करण्याची तयारी मात्र आधीचकरावी लागते. यासाठी दोन दिवस आधी वाल भिजत घाला आणि एक दिवस भिजलेल्यानंतर आदल्या दिवशी ते एका सुती कापडात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे त्याला छान मोड येतील.

डाळिंबी उसळ साहित्य

  • दोन वाटी सोललेले वाल
  • तेल
  • मोहरी
  • पाव चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • हळद
  • एक चमचा लाल तिखट
  • चार- पाच कढीपत्ता
  • सुके खोबरे
  • गूळ
  • आमसूल
  • कोथिंबीर
  • किसलेला ओला नारळ
  • चवीपुरतं मीठ

गुढीपाडव्यासाठी डाळिंबी उसळ करण्याची कृती –

१. मोड आलेले वाल कोमट पाण्यात भिजवून सोलून ठेवा ज्यामुळे ते सोलणं सोपं जाईल.

२. कढईत किसलेला सुका नारळ, जिरे भाजून मिक्सरमध्ये वाटून वाटण तयार करा.

३. कढईत तेलाची फोडणी करून त्यात जिरे, हिंग, तिखट कढीपत्ता, कोथिंबीर घालून डाळिंब्या परतून घ्या. पाणी टाकून त्यात जिरे आणि खोबऱ्याचे वाटण टाका.

हेही वाचा >> चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना

४. भाजी शिजून उकळ आली की आमसूल आणि मीठ टाका. गॅस बंद करून ओले खोबरे पेरा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular indian festival recipes for gudi padwa 2024 how to make dalimbi usal recipe in marathi srk
Show comments