Potato Cheese Balls Recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट बनेल आणि सगळ्यांना जरूर आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या ‘पोटॅटो चीज बॉल्स’ची रेसिपी.
साहित्य
२ उकडलेले बटाटे
१ चिरलेला कांदा
१ चिरलेली हिरवी मिरची
१ टेबलस्पून लाल मिरची पावडर
अर्धा टेबलस्पून मीठ
अर्धा टेबलस्पून गरम मसाला
कोथिंबीर
चीज
२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
१ टेबलस्पून मैदा
u
कृती
- २ उकडलेले बटाटे घ्या आणि त्यांना चांगले मॅश करा.
- त्यात १ चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
- बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे तुकडे घ्या, त्यात चीज ठेवून त्याचे बॉल्स तयार करून घ्या.
- एका वाटीत २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, १ टेबलस्पून मैदा आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट (स्लरी) तयार करा.
- तयार केलेल्या बॉल्सला या पेस्टमध्ये बुडवून, ब्रेड क्रम्ब्सने लावा.
- आता मध्यम-आचेच्या तेलात हे बॉल्स तळा.
- तुमचे क्रिस्पी चिजी पोटॅटो बॉल्स तयार आहेत.
हेही वाचा… या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
पाहा VIDEO
ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.