सकाळी नाष्टा काय करायाचा हा प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न? रोज, शिरा-पोहे-उपीटा बनवून महिलांना कंटाळा येतो आणि रोज हा नाश्ता खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा येतो. त्यामुळे काहीतरी वेगळं बनवायचं म्हटलं तर खूप व्याप करावे लागतात पण चिंता करू नका फार कष्ट न घेता, झटपट तयार होणाऱ्या नाश्ताची एक रेसिपी तुम्ही बनवू शकता. या रेसिपी साठी लागणारे साहित्य आपल्या स्वयंपाक घरात असते.
तुम्ही कच्चा बटाटा आणि गव्हाचे पीठ वापरून खमंग बटाट्याचे धिरडे बनवू शकता. हा पदार्थ चवीला अप्रतिम आहेच पण बनवणे देखील अत्यंत सोपे आहे. हा नाश्ता लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आवडेल. मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारा हा चविष्ट पदार्थ आहे.

कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठाचे धिरडे

कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • किसलेला बटाटा – ३
  • किसलेला कांदा – १
  • चिली फ्लेक्स – १ चमचा
  • काळिमीरी पावडर -पाव चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • जिरे – अर्धा चमचा
  • गव्हाचे पीठ – ३ चमचा
  • रवा – १ चमचा
  • कोथिंबीर – थोडीशी

हेही वाचा –कच्चा बटाटा आणि बेसनचा बनवा खमंग कुरकुरीत नाश्ता, तेही फक्त १० मिनिटांत, झटपट लिहून घ्या रेसिपी

कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्याची कृती

  • प्रथम बटाट्याचे साल काढून घ्या आणि लगेच त्याला पाण्यात ठेवा जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही.
  • एका कांदा साल काढून घ्या
  • आता कांदा आणि बटाटा किसनीवर बारीक किसून घ्या.
  • आता एका भांड्यात कांदा आणि बटाट्याचा किस काढून घ्या. त्यात गव्हाचे पीठ तीन चमचे टाका आणि कुरकुरीतपणासाठी एक चमचा रवा घाला.
  • आता यात अर्धा चमचा जिरे, एक चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून एकत्र करा.
  • आता तवा चांगला तापवून त्यावर थोडा तेल टाका आणि त्यावर बटाट्याचे मिश्रण घालून त्याला धिरड्यासारखा आकार द्या.
  • दोन्ही भाजूने चांगले खरपूस भाजून घ्या. तुम्हाला हवे असेल तर थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजू शकता.

हेही वाचा – झणझणीत बटाट्याचा ठेचा! एकदा खाऊन तर पाहा, झटपट लिहून घ्या रेसिपी

हेही वाचा – पोहे अन् कच्चा बटाटा वापरून झटपट बनवा खमंग खरपूस नाश्ता, दही आणि लोणच्याबरोबर खा चविष्ट पराठा

आता गरम गरमा बटाट्याच्या धिरड्यावर सॉस किंवा चटणीबरोबर ताव मारा.

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली?