Potato Egg Roll: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी नॉन व्हेज प्रेमींसाठी खास ठरेल. या रेसिपीचं नाव आहे, ‘पोटॅटो एग रोल’
साहित्य
२ उकडलेले बटाटे
अर्धा चिरलेला कांदा
१ चिरलेली हिरवी मिरची
तिखट लाल मिरची पावडर
मीठ
धणे पावडर
गरम मसाला
कोथिंबीर
उकडलेले अंडे
१ चमचा कॉर्नफ्लोर
अर्धा चमचा मैदा
ब्रेड क्रंब्स
हेही वाचा… ‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
कृती
- एका बाउलमध्ये २ उकडलेले बटाटे घ्या. त्यात अर्धा चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, तिखट लाल मिरची पावडर, मीठ, धणे पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
- सगळं चांगलं मिसळा.
- एक उकडलेले अंडे घ्या आणि ते मधून कापून घ्या.
- अंड्याला बटाट्याच्या मिक्स्चरने कोट करा.
- एक स्लरी तयार करा (१ चमचा कॉर्नफ्लोर, अर्धा चमचा मैदा आणि पाणी).
- अंड्याला स्लरीमध्ये बुडवून ब्रेड क्रंब्समध्ये लपेटा.
- गरम तेलात तळा.
पाहा VIDEO
ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.