Kolambi Koliwada Recipe In Marathi: कोळंबी हा मासा आपल्याकडे खूप चवीने खाल्ला जातो. कोकणामध्ये कोळंबी माश्यापासून तयार केले जाणारे अनेक पदार्थ बनवले जातात. कोळंबी भात, कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचे कालवण, कोळंबी फ्राय असे पदार्थ म्हणजे कोकणी माणसाचा जीव की प्राण असतात. महाराष्ट्रातील अन्य भागांमध्येही कोळंबी खाल्ली जाते. आपल्याकडे कोळंबीपासून बनवला जाणारा कोळंबी कोळीवाडा हा पदार्थ खूप फेमस आहे. दुपारी जेवणामध्ये काहीतरी चमचमीत पदार्थ बनवायचा असल्यास घरी कोळंबीची ही डिश बनवू शकता. संध्याकाळी पाहुणे घरी आल्यावर किंवा पावसाळ्यात गार वातावरणात कोळंबी कोळीवाडा हा चविष्ट पदार्थ खाऊ शकता. कोळंबी ही शरीरासाठी पौष्टिक असल्याने लहान मुलांच्या जेवणामध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. अशा या चविष्ट पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य:

  • २० ते २५ मोठी कोळंबी
  • १ कप बेसन
  • २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण
  • २ मोठे चमचे मसाला
  • १ मोठा चमचा लाल तिखट
  • १ मोठा चमचा जिरे पूड
  • १ चमचा ओवा
  • १ मोठा चमचा लिंबाचा रस
  • ४ मोठे चमचे दही
  • १ मोठा चमचा चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल

कृती:

  • कोळंब्यांना लिंबाचा रस, आलं-लसूण वाटण, जिरे पूड, मसाला, तिखट, दही व मीठ चांगले चोळून घ्या.
  • त्यानंतर त्याला ओवा, बेसन व तांदळाचे पीठ लावून ही कोळंबी तेलात तळून घ्या.
  • त्यानंतर वरुन चाट मसाला भुरभुरा.

आणखी वाचा – Prawns Rice: घरच्या घरी झणझणीत कोळंबी भात बनवायचाय? पटकन नोट करा सोपी रेसिपी

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prawns koliwada recipe in marathi how to make kolambi koliwada at home easy recipe know more yps
First published on: 28-04-2023 at 16:44 IST