विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला

विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला साहित्य

१/२ किलो कोलंबी
१ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
१ टीस्पून आलं लसूण पेस्ट
१/२ लिंबाचा रस
हिरवा मसाला बनवण्यासाठी
मूठ भर कोथिंबीर
१ हिरवी मिरची
१ इंच आलं
१ गड्डा लसूण
१ टीस्पून जीरे
थोडं पाणी
सावजी वाटण बनवण्यासाठी
१ मध्यम आकाराचा कांदा
१ तेजपत्ता
१ टीस्पून खसखस
४-५ काळीमिरी
२ हिरव्या वेलच्या
१ इंच दालचिनी
२ टेबलस्पून किसलेलं सुक खोबर
२-३ सुक्या काश्मीरी लाल मिरच्या
३-४ टेबलस्पून तेल

विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला कृती

१. सर्वात आधी कोळंबी स्वच्छ निवडून,स्वच्छ करून,धुवून पाणी निथळून घ्या. त्या नंतर त्यात हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मॅरीनेट करून घ्या.

२. हिरव्या वाटनासाठी लागणारे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून हिरवे वाटण करून घ्या.

३. आता विदर्भ स्पेशल मसाला बनवून घेऊ. त्यासाठी एक पॅन गरम करून त्यात १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा, आणि इतर गरम मसाले, सुकं खोबर घालून एकजीव करून घ्या. त्यात काश्मीरी लाल सुक्या मिरच्या घालून परतून घ्या आणि मिश्रण चांगले खरपूस भाजून झाले की ते थंड करून त्याची एक पेस्ट बनवून घ्या.

४. आता कोळंबी थोड्याश्या तेलात फ्राय करून घ्या. आणि त्याच भांड्यात परत थोडं तेल घालून, त्यात हळद,लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

५. त्यात तयार विदर्भ मसाला वाटण घालून घ्या आणि तेल सुटेपर्यंत मिक्स करा. नंतर त्यात हिरवे वाटण घालून चांगले परंतुन घ्या, ग्रेव्ही तयार आहे. त्यानंतर फ्राय केलेली कोलंबी तयार ग्रेव्हीमध्ये सोडून घ्या आणि गरजेनुसार पाणी घालून, आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही छान ढवळून घ्या.

हेही वाचा >> Sunday special: चमचमीत ‘मटण खिमा टोस्ट सँडविच’, ही रेसिपी नक्की ट्राय करा

६. ५ मिनिट कोळंबी वाफेत शिजू द्या आणि बस खायला तयार आहे गरमगरम विदर्भ झिंगा फ्राय मसाला.