मासे म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्यात जर बिनकाट्याचे मासे असतील तर अति उत्तम. विशेष म्हणजे बऱ्याच व्यक्तींना मच्छीमध्ये कोळंबी हा प्रकार अधिक प्रमाणात आवडतो. कारण यामध्ये काटा नसून ती खाण्यास देखील चवदार असते. त्याचप्रमाणे कोळंबीपासून तयार होणारे विविध पदार्थ देखील चाखायला मिळतात. आत्तापर्यंत तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस यांसारखे कोळंबीपासून तयार केलेले अनेक पदार्थ तयार केले असतील. आज आम्ही तुमच्यासाठी याच कोळंबीची एक रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण बनवणार आहोत, कोळंबी कैरीची रसगोळी आमटी. चला तर जाणून घेऊया कशी बनवायची ही आमटी.

कोळंबी कैरी रसगोळी आमटी साहित्य –

  • कोळंबी १ वाटी सोलून (मध्यम आकाराची)
  • हळद व मीठ लावून,
  • नारळाचे दूध १ मोठी वाटी (घट्ट हवे)
  • ओलं खोबरं पाव वाटी छोटी
  • १ छोटा कांदा (४ पाकळ्या)
  • कैरी पातळ फोडी
  • धणे १०-१२ दाणे, काळी मिरी ५-६ दाणे
  • सुक्या मिरच्या ५-६, हळद, मीठ, तेल

कोळंबी कैरी रसगोळी आमटी कृती-

ओलं खोबरं, धणे, मिरी, सुक्या मिरच्या, ४ पाकळ्या कांदा, हळद सर्व अगदी गुळगुळीत वाटून घ्या. कढईत तेल तापवून त्यात किंचित हिंग घालून त्यावर कोळंबी घाला. मंद आगीवर परतून चिरलेली कैरी घालून पाच मिनिटे परता. यात वाटलेलं खोबरं, मसाला घालून मंद आगीवर परता आणि कोळंबी जेमतेम बुडेल इतपत कोमट पाणी घालून वाफ काढा. आता यात नारळाचं घट्ट दूध घालून ढवळून मीठ हवं तसं घालून छोटीशी उकळी घ्या. फार उकळू नये. आमटी फुटू शकते (नारळाचे चोथा पाणी होते) झाकण ठेवा. ही आमटी जेवढी मुरेल तेवढी उत्कृष्ट लागते. कैरीचे प्रमाण तिच्या आंबटपणानुसार ठरवा.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी

हेही वाचा – Prawns recipe: कोळंबीचे हिरवे कालवण; पटकन नोट करा सोपी रेसिपी

टीप- नारळाच्या दाट रसातली ही कोळंबीची आमटी त्यातील कैरीमुळे चविष्ट लागते.

Story img Loader