prawns recipe: कोणत्याही सीफूड खाद्यप्रेमींना विचारा आणि तुम्हाला हे समजेल की कोळंबी त्यांच्या खाद्यपदार्थांच्या यादीत सर्वात १ नंबरला आहे. कोळंबी म्हणजे काहींचा जीव की प्राणच. आत्तापर्यंत तुम्ही कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस, कोळंबी भजी यांसारखे कोळंबीपासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला कोळंबीची एक नवी रोसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी चटपटीत असे कोळंबीचे हिरवे कालवण कसे तयार करायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोळंबीचे हिरवे कालवण साहित्य –

  • मोठी कोळंबी (टायगर प्रॉन्स)
  • एक नारळ, लसूण ८-९ पाकळ्या
  • जिरे १ मोठा चमचा, हळद चिमूटभर
  • हिरव्या मिरच्या ६, कोथिंबिरीची जुडी १
  • तांदळाचे पीठ १ मोठा चमचा
  • काळीमिरी ६, लिंबू अर्ध
  • पाणी एक वाटी, मीठ चवीपुरते

कोळंबीचे हिरवे कालवण कृती –

सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या, साफ करा आणि कापा. मात्र त्याचे वरचे कवच तसेच ठेवा. नारळ खिसून घ्या, त्याचे दूध काढा. लसूण, जिरे, हळद, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तांदळाचे पीठ घालून बारीक वाटा. पातेले चुलीवर ठेवून, वाटलेला मसाला पातेल्यात घाला. मसाल्याला तेल सुटल्यानंतर कोळंबी घाला व ढवळा. वरुन नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ घाला, उकळल्यानंतर कोळंबी शिजल्यावर त्याचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर वरुन अर्धा लिंबाचा रस पिळा.

हेही वाचा – Mutton recipe: वीकेंडला ट्राय करा कोकणी पद्धतीचे झणझणीत मटण; ही घ्या रोसिपी

 शेवटी कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा. कोळंबीचे हे कालवण नक्की ट्राय करा आणि कसे होते हे आम्हाला कळवा

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prawns recipe kolmbiche hirave kalvan recipe in marathi srk
Show comments