Prawns Rice Recipe In Marathi: आपल्याकडे कोळंबी हा मासा विविध प्रकारे खाल्ली जातो. काहीजण कोळंबीचे कालवण/ रस्सा बनवतात. तर काही लोकांना कोळंबी फ्राय आवडते. पण कोळंबी भात हा पदार्थ आपल्याकडे सर्वात जास्त लोकप्रिय आहे. मासे खाणाऱ्या लोकांसमोर कोळंबी भात असे नुसते म्हटले तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या चविष्ट पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेऊन आलो आहोत.

साहित्य :

  • २ वाट्या तांदूळ
  • ४ मोठे कांदे
  • ३ लहान टोमॅटो
  • १ वाटी कोळंबी (साफ केलेली)
  • १ मोठा चमचा आलं-लसूण वाटण
  • २ मोठे चमचे बिर्याणी मसाला
  • ३ मोठे चमचे लाल तिखट (आगरी-कोळी मसाला)
  • ४ लाल मिरच्या
  • ५ लवंग
  • १ इंच दालचिनी
  • २ वेलची (वाटून घेतलेल्या)
  • १ चमचा जिरे
  • २ तेजपत्ता
  • अर्धा वाटी तेल
  • मीठ चवीनुसार

कृती :

  • तांदूळ चांगले धुऊन त्यात तेजपत्ता टाकून भात शिजवून सुटा करा.
  • कढईत तेल तापवून जिरं, आलं-लसूण, परता. त्यानंतर त्यामध्ये कांदे, टोमॅटो टाकून परता.
  • सर्व मसाले, वाटण त्यामध्ये टाका आणि पुढे कोळंबी टाकून एक वाफ आणा.
  • हे करत असताना चवीनुसार मीठ टाकायला विसरु नका.
  • नंतर त्या मिश्रणामध्ये भात, कोथिंबीर टाकून चांगले एकत्र करा व एक वाफ आणा.

आणखी वाचा – Mutton Chops: नॉन व्हेज खायचा मूड झालाय? घरच्या घरी बनवा चविष्ट मटण चॉप्स, नोट करा रेसिपी

Commercial LPG Cylinder Price Hike by Rs 48.50
LPG Price Hike : सणासुदीच्या आधी नागरिकांना झटका, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
a woman was robbed of her gold chain right at her doorstep in broad daylight
घराच्या गेटवरून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली, महिला पाहतच राहिली.. VIDEO एकदा पाहाच
Arbaaz Patel And Nikki Tamboli
“तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”
Viral Video Of Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli famous dialogues
बाईईई…! आज्जीची मशेरी लावण्याची सवय, नातवाने निक्कीच्या स्टाईलमध्ये गायलं गाणं; पाहा VIDEO
Mouse entered into ganapati bappa's idol
बापरे! बाप्पाच्या मूर्तीमध्ये शिरून उंदराने पोखरला बाप्पाचा हात VIDEO पाहून नेटकरी झाले अवाक्
Gold Silver Price Today in Marathi| Gold Silver Rate Today in Marathi
Gold Silver Price Today : सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील २२ कॅरेट सोन्याचा दर
woman commits suicide for mobile marathi news
पिंपरी-चिंचवड: पत्नीने केली मोबाइलच्या हट्टापायी आत्महत्या; वाकड मधील घटना

कोळंबी हा मासा भारतासह जगभरात खाल्ला जातो. त्याच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. याशिवाय काही विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. तसेच कोळंबी माश्यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे हेल्थ कॉन्शियस मंडळीही याचा मनापासून आस्वाद घेत असतात. कोळंबीमध्ये हाय कोलेस्ट्रॉल असल्याने याचे सेवन आरोग्यदायी असते.