Dahi Papdi Chaat: स्ट्रीट फूड म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतेच. विशेषत: पाणीपुरी आणि चाट, म्हटलं की आपल्या खाण्याची इच्छा होते. बहुतेक लोक बाहेर जाऊन चाट खाणे पसंत करतात. पण तुम्ही कधी घरी चाट तयार करून बघितला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी विकतच्यासारखा चाट घरीच तयार करण्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी शेफ रणवीर ब्रारने शेअर यांनी युट्युबवर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी दही पापडी चाट तयार करण्याची सोपा मार्ग सांगितला आहे. दही पापडी चाटसोबतच त्यांनी चटणीची रेसिपीही सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊया घरी कसा करायचा दही पापडी.
दही पापडी चाट
तयारीसाठी लागणारा वेळ – 10-15 मिनिटे
चाट तयार करण्यासाठी लागणार वेळ – 25-30 मिनिटे
किती लोकांसाठी – 2 व्यक्ती
दही पापडी कसे तयार करावे?
पापडी तयार करण्यासाठी
२ कप – मैदा, २ चमचे – रवा, १ टीस्पून – बेसन, चवीनुसार मीठ, १/२ टीस्पून काळी मिरी ठेचून२ चमचे – तेल, थोडासा ओवा टाकून सर्व साहित्य एकत्र करुन व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी आणि टाकून व्यवस्थित मिळून घ्या. पीठ खपू घट्ट मळू घ्या. अर्धा चमचा तेल लावून पीठ बाजूला ठेवा. अर्ध्या तासाने एक गोळा तयार करुन मोठी पाती लाटून घ्या. त्याला काटे चमच्याने त्याला टोचून घ्या, जेणून करुन पापडी फुगणार आहे. त्यानंतर छोट्या ग्लास दाबून त्याचे गोल पापडी तयार करा. गरम तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
हेही वाचा : शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवा समोसा! छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल, लिहून घ्या रेसिपी
चिंचेची चटणी कशी तयार करावी
२ कप – पाणी, १ वाटी – भिजवलेली चिंच, १ कप – गूळ, ४-५ खजूर, चवीनुसार मीठ, १-२चमचे – तेल, ५-६काळी मिरी, २-३ हिरवी वेलची, १ टीस्पून लाल तिखट टाकून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या अथवा मिश्रण थंड झाल्यांनतर चाळणीमध्ये गाळून घ्या.
चिंचेची चटणीला फोडणी देण्यासाठी एका भांड्यात २ टीस्पून – तेलामध्ये २ – सुक्या काश्मिरी लाल मिरची, १०-१२ मनुका,
एक चिमूटभर हिंग टाका. त्यानंतर त्यामध्ये २-३ चमचे पाणी टाकून, चिंचेची मिश्रण टाता आणि आवश्यकतेनुसार पाणी टाका.
हिरवी चटणी कशी तयार करायची
३-४ – हिरव्या मिरच्या, १ इंच – आले ½ कप, पुदिन्याची पाने, १ कप – कोथिंबीर, ½ टीस्पून – साखर, चवीनुसार मीठ 1 ½ टीस्पून – तेल टाकून मिश्रण वाटून घ्या.
हेही वाचा : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये बनवा टेस्टी ओट्स थेपला, जाणून घ्या सोपी रेसिपी
पापडीसाठी चाट मसाला
1 टीस्पून – जिरे, 1 टीस्पून – बडिशेप, 1 टीस्पून – काळी मिरी, १ – हिरवी वेलची
१ मोठा वेलची बिया,१/४ मोहरी,१ १/२ टीस्पून – धने पावडर,चवीनुसार मीठ
१ १/२ टीस्पून – आमचूर पावडर, १/२ टीस्पून – लाल तिखट सर्व मिश्रण तव्यामध्ये चांगले परतून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून चाट मसाला तयार करा.
पापडी चाटसाठी रगडा कसा तयार करावा
५-६ उकडलेले बटाटे व्यवस्थित बारीक तुकडे कापून घ्या त्यामध्ये १/३ कप – काळे हरभरे उकडलेले टाका. त्यात १ इंचब बारीक चिरलेले आले, १ १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. त्यामध्ये पापडीसाठी तयार केलेला चाट मसाला टाका. आता एक 1-2 टीस्पून – तेलामध्ये एक चिमूटभर हिंग टाकून फोडणी मिश्रणात टाका.
दही पापडी चाट कसे तयार करावे
तळलेली पापडी घ्या त्यावर चिंचेची चटणी, कुस्करलेले बटाटे, दही, डाळिंबाचे दाणे, तयार चाट मसाला, हिरवी चटणी, बुंदी,चिंचेची चटणी, लाल मिर्ची पावडर टाकावी. कोथिंबीरी टाकून सजवावी. चटपटीत पापडी चाट तयार आहे.