Propose Day 2023: प्रेमी युगुलांसाठी वर्षभर प्रेमाचं वारं वाहत असलं तरी, फेब्रुवारी हा त्यांच्यासाठी खूप खास महिना असतो. या महिन्यामध्ये व्हॅलेन्टाइन डे असतो. काही हौशी मंडळी व्हेलेन्टाईन डेपेेक्षा व्हेलेन्टाईन विक साजरा करतात. या व्हेलेन्टाईन विकमध्ये येणारा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रपोझ डे. या दिवशी ज्यांच्यावर प्रेम आहेत अशांना प्रपोझ करत मनातील भावना व्यक्त केल्या जातात. प्रत्येक प्रेमी आपल्या प्रियजनाना इप्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करत असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हटलं जात की, व्यक्तीच्या हृदयामध्ये शिरकाव करण्याचा मार्ग पोटामार्गे जातो. याच गोष्टीचा आधार घ्या आणि आवडत्या व्यक्तीसमोर मनातील भाव मांडताना त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी स्वत:च्या हातांनी बनवलेला रेज व्हेलवेट केक न्या. ज्याने त्या व्यक्तीवर तुमचा अधिक प्रभाव पडेल. चला तर मग जाणून घेऊयात घरच्या घरी रेड व्हेलवेट केक कसा बनवण्याची रेसिपी…

साहित्य –

  • रेड व्हेलवेट स्पंज मिक्स:- 100 ग्रॅम
  • व्हीप्ड क्रीम:- 75 ग्रॅम
  • चीज मस्करपोन:- 15 ग्रॅम
  • क्रीम चीज:- 20 ग्रॅम
  • आयसिंग शुगर:- 15 ग्रॅम
  • शुगर सिरप:- 15 मिली
  • व्हाइट चॉकलेट कंपाउंड:- 30 ग्रॅम
  • वेलची पावडर:- 1 ग्रॅम

कृती –

सर्वप्रथम 100 ग्रॅम रेड व्हेलवेट स्पंज मिक्स घ्या. त्यामध्ये पाणी आणि तेल एकत्रितपणे टाका. केकच्या बॅटरमध्ये गुठल्या पडणार नाही यासाठी ते नीट मिसळा. त्यानंतर ते 180 अंशांवर 5 मिनिटांसाठी प्रीहीट करा.

पुढे केक पॅन घ्या आणि बटरचा किंचित थर राहिलं अशा प्रमाणामध्ये पॅनला बटर लावा. केकचा बॅटर पॅनमध्ये टाका आणि एका मिनिटासाठी ते सेट होऊ द्या. ते झाल्यावर पॅन मायक्रोवेव्हामध्ये ठेवा आणि साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी केक बेक होऊ द्या.

केकचा बेस बनत असताना उरलेले साहित्य (व्हीप्ड क्रीम, चीज मस्करपोन, क्रीम चीज, वेलची पावडर,आयसिंग शुगर – वर दिलेल्या प्रमाणानुसार) ध्या आणि त्याचे रुपांतर क्रीम फ्रॉस्टिंग होईपर्यंत ते व्यवस्थितपणे मिसळा.

हे करेपर्यंत केक बेक होत आला असेल. वेळ पूर्ण झाल्यानंतर तो मायक्रोवेव्हमधून बाहेर काढून थंड होऊ द्या. पुढे तो स्पंज केक पॅनमधून बटर पेपरवर सेट होऊ द्या. स्पंज केकचा तो बेस सेट झाल्यावर त्याला हवा तो आकार द्या आणि त्यावर तयार केलेल्या फ्रॉस्टिंग लावा. तयार झालेल्या केकवर मनाप्रमाणे सजावट करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Propose day special recipe impress your love one by baking red velvet cake read recipe yps