Pudachi Kothimbir Vadi Recipe In Marathi: दररोज नाश्त्यासाठी अनेकदा काय बनवावं ते कळत नाही. अनेकदा तेच तेच खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. म्हणून तुम्ही घरच्या घरी एक रेसिपी ट्राय करू शकता, जी झटपटही होते आणि चवदार आहे. चला तर मग, जाणून घेऊ या ‘पुडाची कोंथिबीर वडी’ घरच्या घरी कसे बनवायची…
साहित्य
- 1/2 किलो गावरान सांबार (कोथिंबीर)
- 1/2 किलो बेसन
- 1 पाव मैदा
- 2-3 टीस्पून रवा
- 4-5 हिरव्या मिरच्या
- 1/2 मेजरींग कप तिळ
- 1/2 मेजरींग कप खोबरं किस
- 3/4 वाटी खाकस
- 4-5 काजु
- शेंगदाणे
- 4-5 लसूण पाकळ्या
- 1 टीस्पून तिखट
- चवीनुसार मीठ
- 1/3 हळद
- फोडणीसाठी तेल
- लसूण जीरे पेस्ट
कृती
प्रथम कोथिंबीर तोडून स्वच्छ पाण्याने धुऊन सुकवून बारीक चिरून घ्या.
नंतर बेसन, मैदा, रवा, तिखट मीठ हळद धने पूड लसूण जीरे पेस्ट गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करून पिठ भिजवून ठेवले.
तिळ, खोबरं किस काजु शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले.
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून लसूण पाकळ्या टाकून त्यात लसूण पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड घालून चिरलेला सांबार घालून मिक्स करून घेतले.
नंतर भाजलेले शेंगदाणे तिळ, खोबरं थोडे जाडसर बारीक करून घेतलेले सांबार मसाला घालून मिक्स करून घेतले.
नंतर पुडा साठी भिजलेल्या पिठाचा गोळा लाटून मसाला पाणी लावून सारण भरून सांबार मसाला भरून वडी तयार करून ठेवली.
नंतर कढईत तेल गरम करून वडी तळून घेतली (वाफवून घेतलेली वडी नंतर गरम गरम तळून खूप टेस्टी होते)
पुडाची कोंथीबीर वडी तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.