Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi: तुम्ही अनेकदा घरी कढी बनवलीच असेल. भाताबरोबर कढी अगदी चविष्ट लागते. आज आपण नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार ट्राय करणार आहोत. ही रेसिपी वाचून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. अगदी सोपी आणि चवदार असलेली पंजाबी कढी पकोड्याची रेसिपी पाहून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

कढी बनवण्यासाठी साहित्य

  1. 1/2 लिटर ताक
  2. 3 चमचे बेसन
  3. 2 लाल सुक्या मिरच्या
  4. आले लसूण पेस्ट
  5. लाल तिखट
  6. हळद
  7. 1 मोठा कांदा
  8. जीरे
  9. राई
  10. कढीपत्ता
  11. हिंग
  12. ओवा- कोथिंबीर
  13. तेल
  14. चवीनुसार मीठ

पकोडा बनवण्यासाठी साहित्य

  1. 1 मोठा कांदा
  2. आवश्यक वाटल्यास चिरलेला कोबी
  3. बेसन
  4. ओवा
  5. लाल तिखट
  6. हळद
  7. तांदळाचे पीठ
  8. आले लसूण पेस्ट
  9. तेल
  10. चवीनुसार मीठ

कृती

प्रथम एका भांड्यात २-३ चमचे बेसन घेऊन त्यात आले लसूण पेस्ट,ओवा,लाल तिखट, हळद, मीठ घालून त्यावर अर्धा लिटर ताक घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

नंतर गॅस चालू करून त्यावर एका भांड्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात कढीपत्ता, जीरे, १ सुकी लाल मिरची,राई, हिंगाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून थोडा लाल सर झाला की त्यात बेसन ताकाचे मिश्रण ओतून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

बेसनच्या गुठळ्या होऊ नये म्हणून सतत ढवळत रहा. वरून थोडे पाणी घाला. नंतर २-३ उकळ्या आल्या की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिश्रण ढवळून वरून कसुरी मेथी घाला व गॅस बंद करा.

पकोडा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात १ मोठा बारीक चिरलेला कांदा घेऊन, बारीक चिरलेला कोबी, आले लसूण पेस्ट, ओवा, जीरे, लाल तिखट, हळद, मीठ, आणि आवश्यक ते नुसार बेसन, थोडे तांदळाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आवश्यक वाटल्यास पाणी घाला.

आता दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात वरील बेसन चे गोळे एक एक करून सोडा व दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत तळून घ्या. व थोडे थंड झाले की वरील कढीत सोडा.

कढीला पुन्हा वरून एकदा लाल सुक्या मिरची जीरे, लाल तिखट तेलाची फोडणी द्या.

तयार पंजाबी कढी पकोडा… गरमागरम जीरा राईस बरोबर सव्हऀ करा.