Puri Bhaji Recipe : पुरी भाजी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. अनेक जण आवडीने पुरी भाजी खातात. काही लोकांना हॉटेलमधील पुरी भाजी खायला आवडते पण तुम्ही घरी सुद्धा हॉटेलसारखीच चविष्ठ पुरी भाजी बनवू शकता. ही पुरी भाजी बनविणे अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला ही खास रेसिपी जाणून घ्यावी लागेल.

पुरी कशी बनवावी?

साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • रवा
  • मीठ
  • तेल
  • मीठ

कृती

  • सुरुवातीला गव्हाचे पीठ एका भांड्यात घ्यावे. त्यात रवा टाकावा
  • त्यानंतर त्यात थोडे गरम तेल टाकावे.
  • थोडे चवीनुसार मीठ घालावे
  • पाण्याने पीठ मळून घ्यावे.
  • पीठ कडक मळावे.
  • अर्धा तास हे मळलेले पीठ झाकूण ठेवावे.
  • त्यानंतर तेल लावून पुरी लाटून घ्यावी.
  • पुरी तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे.
  • गरम तेलात पुरी तळून घ्यावी.

हेही वाचा : २२ जानेवारीला घरी बनवा प्रभू रामाचा प्रसाद, ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या

Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
तांदळाचे बोर
दिवाळी स्पेशल फराळ! ‘या’ दिवाळीत बनवा हटके पदार्थ, जाणून घ्या कसे बनवावे तांदळाचे बोर
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Diwali faral recipe garlic sev lasun shev recipe in marathi lasun shev easy recipe
२ कप बेसन वापरून सोप्प्या पद्धतीने बनवा कुरकुरीत लसूणी शेव; फराळाची मजा वाढवेल ‘लसूण शेव’
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती

भाजी कशी बनवावी?

साहित्य

  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेले टोमॅटो
  • कढीपत्ता
  • उकळलेले बटाटे
  • लसूण
  • आलं
  • जिरे
  • मोहरी
  • हिंग
  • लाल तिखट
  • लवंग
  • मिरे
  • दालचिनी
  • खोबरे
  • धनेपूड
  • गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ

कृती

  • सुरुवातीला बटाटे उकळून घ्या.
  • त्यानंतर हे बटाटे सोलून घ्या आणि हाताने कुस्करुन घ्या.
  • त्यानंतर लसूण आणि आलं बारीक ठेचून घ्या.
  • कढई गॅसवर ठेवा त्यात तेल गरम करा.
  • त्यानंतर गरम तेलात मोहरी आणि जिरे टाका
  • त्यानंतर त्यात दालचिनी, तीन लवंग, तीन मिरे टाकावीत
  • दोन तेजपान टाकावे आणि त्यात ठेचून घेतलेले आलं लसूण त्यात टाकावे.
  • त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा.
  • त्यानंतर त्यात कढीपत्ता घालावा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.
  • त्यात बारीक किसलेले खोबरे त्यात घालावे.
  • त्यात हळद आणि हिंग टाका.
  • कमी आचेवर परतून घ्या
  • लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला त्यात टाका आणि परतून घ्या.
  • त्यानंतर उकळलेले बटाटे त्यात टाका आणि चांगले परतून घ्या.
  • शेवटी त्यात थोडे प्रमाणानुसार गरम पाणी घाला.
  • भाजीला उकळी येऊ द्या.
  • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यात टाका.शेवटी ही गरमा गरम पुरी भाजी तुम्ही सर्व्ह करू शकता.