Puri Recipe : पुरी असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. अनेकजण पुऱ्या तेलकट असतात म्हणून खाणे टाळतात पण आज आम्ही तुम्हाला परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही टम्म फुगणाऱ्या आणि कमी तेलकट पुऱ्या बनवू शकता.चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- गव्हाचं पीठ
- मीठ
- तेल
- पाणी
हेही वाचा : Kohlyache Bond : विदर्भातील पारंपारिक कोहळ्याचे बोंड, जाणून घ्या ही हटके रेसिपी
कृती
- गव्हाच्या पीठात चवीनुसार मीठ घाला आणि पाणी घालून घट्टसर मळून घ्या.
- कणीक मळल्यानंतर १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
- छोटे छोटे गोळे करायचे आणि पुऱ्या लाटून घ्याव्यात.
- त्यानंतर मध्यम ते जास्त आचेवर पुरी तळून घ्याव्यात.
टिप्स :
टीप १ – कणीक मळताना मोहन घालायचं नाही. गरम तेल किंवा थंड तेल टाकायचं नाही.
टीप २ – कणीक सैल मळायची नाही. कारण नंतर त्याला पीठ लावावं लागतं ज्यामुळे पुरी तेल जास्त शोषून घेते आणि पुरी तेलकट होते.
टीप ३ – कणीक मुरल्यानंतर पुरी लाटायची घाई करायची नाही. कणीकीचा गोळा आणखी चांगला मळून घ्यावा.
टीप ४ – पुरी लाटताना तेलाचा किंवा पिठाचा वापर करायचा नाही.
टीप ५ – पुरी तळताना सुरुवातीला एकच बाजू चांगली तळून घ्यायची पुरी फुगल्यावर नंतर दुसऱ्या बाजूने फिरवा.