खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी गोष्टींमुळे जीवनशैलीवर परिणाम होऊन वजन वाढण्याची शक्यता असते.वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक जीमला जातात. जीमला जाऊन फरक पडला नाही तर बाजारात मिळणाऱ्या गोळ्या औषध खाल्ली जातात. पण यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा आहारतज्ज्ञ गोळ्या औषधांपासून लांब राहण्याचा सल्ला देतात. प्रोटीन पावडर किंवा इतर गोळ्या औषधांचा वापर न करता घरातील पदार्थ खाऊन वाढलेले वजन कमी करता येते. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळच्या आहारात बनवलेला सॅलेडचा समावेश करू शकता.
पर्पल कॅबेज हेल्दी सॅलड साहित्य
१ मोठं भांड भरून पर्पल कॅबेज बारीक चिरलेलं
पिवळी सिमला मिरची बारीक कापलेली
ब्रोकोलीएक मोठी वाटी भरून बारीक कापलेली
१ एप्पल बारीक चिरलेलं
१ वाटी हिरवा कोबी बारीक चिरलेला
२ चमचे मध
२ छोटे चमचे मिरी पावडर
चवीनुसार मीठ
१ टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल
१ मोठातुमचा ब्लॅक आणि येल्लो किसमिस
१ चमचा मॅरीनेटेड ब्लॅक ऑलिव्ह
२ चमचे लिंबाचा रस
पर्पल कॅबेज हेल्दी सॅलड कृती
१. नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालावे मग पर्पल व हिरवा कोबी घालून छान फ्राय करावे.
२. मोठा गॅस ठेवावा तो दोन मिनिटं झालं की पिवळी सिमला मिरची व ब्रोकोली घालून तेही दोन मिनिटांसाठी मोठ्या गॅसवर फ्राय करावे.
३. सगळ्यात शेवटी एप्पल घालावे मग मीठ, बारीक काळीमीरी घालून लिंबाचा रस घालावा व छान परतावे गॅस मोठाच ठेवावा.
हेही वाचा >> विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
४. त्यामध्ये दोन्ही किसमीस, मध व ऑलिव्ह ऑईल घालून गॅस बंद करावा. बंद गॅस केल्यावर दोन मिनिटांसाठी परतावे कारण पॅन गरम असतो. त्यामध्ये सगळं एकजीव होतं व हेल्दी सॅलड गरम किंवा कोमट खायला द्यावे. थंडीच्या दिवसात अतिशय टेस्टी व हेल्दी सॅलड होते.