Matar cutlets recipes: दररोज नाश्त्यासाठी नवनवीन पदार्थ कोणते करायचे, असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही झटपट होणारे टेस्टी मटार कटलेट नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग पटकन लिहून घ्या मटार कटलेटची सोपी रेसिपी
मटार कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी मटार
- २ वाटी मका
- १-२ उकडलेले बटाटे
- १/२ वाटी भिजवलेले पोहे
- २ चमचा आल-लसूण पेस्ट
- १/२ वाटी रवा
- ३-४ मिरच्या
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
हेही वाचा: नुसतं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटेल, सोप्या पद्धतीत बनवा नाचणीचे पौष्टिक चिप्स
मटार कटलेट बनवण्याची कृती:
- सर्वप्रथम मटार आणि मका पाण्यात उकळवून घ्या आणि यानंतर मटार आणि मका मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- आता एका प्लेटमध्ये मटार, मका, उकडलेला बटाटा, आलं-लसूण पेस्ट, भिजवलेले पोहे, चिरलेली कोथिंबीर एकजीव करून घ्या.
- तयार मिश्रणाचे कटलेटच्या आकारात गोळे तयार करून घ्या आणि पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे.
- त्यानंतर गरम तेलात कटलेट रव्यात घोळवून शॅलो फ्राय करून घ्या.
- तयार गरमा गरम मटार कटलेट सॉसबरोबर सर्व्ह करा.