खवा, पेढे, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ यात दिवाळीच्या काळात भेसळ होतेच. त्यामुळे असा कोणताही पदार्थ सणासुदीच्या काळात विकत आणायला जरा भीती वाटतेच. म्हणूनच ही एक रेसिपी बघून घ्या.फक्त १० रुपयांचे बिस्किट वापरुन बनवा अफलातून मिठाई. चला तर ही रेसिपी जाणून घेऊयात.
बिस्किट मिठाई साहित्य
१. २ मारी बिस्कीट पुडे
२. ४ चमचे मिल्क पावडर
३. ४ चमचे डेसिकेटेड कोकोनट पावडर
४. १०० मि.ली ग्राम दूध
५. २ चमचे साजूक तूप
६. ५० ग्राम पिठीसाखर
बिस्किट मिठाई कृती
१. प्रथम बिस्कीटे मिक्सर मधून बारीक करुन घ्यावी.एका पॅनमध्ये दूध उकळायला ठेवा. आपल्याला दूध थोडे आटवून घ्यायचे आहे. साधारण आटून दूध निम्मे होईल, इथपर्यंत ते उकळावे.
२. आता एकीकडे साखरेचा पाक करून घ्या. यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात साखर घाला. साखर जेवढी असेल, तेवढेच पाणी टाकावे. पाण्यात जेव्हा साखर पुर्णपणे विरघळून जाईल तेव्हा त्यात आटवलेले दूध टाकावे.
३. आता या दूधात बिस्किटांचे तुकडे घाला. दूध आणि बिस्किटे एकजीव होईपर्यंत ते मिश्रण हलवत राहा. जेव्हा मिश्रण कढईच्या बाजुने सुटू लागेल आणि त्याचा एक घट्ट असा गोळा तयार होऊ लागेल, तेव्हा त्यात थोडे तूप, वेलची पावडर सोडा. मिश्रण खूपच घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
४. आता गॅस बंद करा. एका ताटलीला तूप लावा. त्यात आपण तयार केलेला गोळा ठेवा आणि ताटलीभर समप्रमाणात पसरवून घ्या. त्यावर छानपैकी सुकामेवा पेरा. पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर घालून बिस्किटांचा तयार केलेला गोळा पोळपाटावर लाटून घ्यावा.
हेही वाचा >> जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी खास “सोड्याची खिचडी” झटपट होईल तयार
५. आता दुसरा तयार केलेला गोळा त्याचा रोल तयार करून लाटलेल्या बिस्किटाच्या पोळीवर ठेवून प्लास्टिक पेपर फिरवत रोल तयार करावा
६. सुरीने कापून छोटे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवून किंवा तसेही सर्व्ह केले तरी लाजवाब वाटतात.