Benefits Of Eating Radish Leaves: हिवाळ्यामध्ये बाजारात मुळा भरपूर प्रमाणात मिळतो. बाजारातले काही हौशी भाजी विक्रेते अतिशय आकर्षक पद्धतीने पांढराशुभ्र मुळा एकावर एक रचून ठेवतात. ती सुरेख मांडणी पाहिली की लगेचच मुळा घेऊन खावासा वाटतो. बरेच जण मुळा तोंडी लावायला घेतात. मात्र मुळ्यासोबतच मुळ्याचा पालाही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात. याच पाल्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.
मुळ्याचा पाला रेसिपी साहित्य
- मुळ्याचा पाला
- मुगाची भिजवलेली डाळ
- तेल, मोहरी, हिंग, जिरे
- लसूण
- मीठ आणि तिखट
मुळ्याचा पाला कृती
मुळ्याचा पाला कधीही कच्चा खाऊ नका. मुळ्याचा पाला स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो बारीक चिरून घ्या.
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल, मोहरी, हिंग, जिरे आणि लसूण टाकून फोडणी करून घ्या.
त्यानंतर कांदा परतून घ्या आणि मग मुळ्याचा पाला टाकून तो सुद्धा परतून घ्या. चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. नंतर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या. यामध्ये तुम्ही हरबऱ्याची किंवा मुगाची भिजवलेली डाळसुद्धा घालू शकता.
मुळ्याचा पाला खाण्याचे फायदे
१. मुळ्याचा पाला खाल्ल्याने कफ, पित्त, वात असे तिन्ही दोष कमी होतात.
२. किडनीस्टोन किंवा मुत्रविकाराचा त्रास कमी होण्यासाठी मुळ्याचा पाला खाणे फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात काेरड्या पडलेल्या त्वचेला द्या ‘हे’ सुपरटॉनिक! ५ पदार्थ खा- ड्राय त्वचा होईल मुलायम
३. अपचनाचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर मुळ्याचा पाला नियमितपणे खाल्ल्यास नक्कीच फायदा होईल.
४. मुळ्याच्या पाल्यातून व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नशियम भरपूर प्रमाणात मिळते.
५. मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठीही मुळ्याचा पाला खाणे फायदेशीर ठरते.