मुळा हा औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. चवीला तिखट आणि तुरट असलेला मुळा बऱ्याच लोकांना खायला आवडतो. मुळा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे एकुणच तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते. मुळामध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे वजन नियंत्रित करू पाहणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. मुळामधील व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मुळ्यामधे टकॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि फायबर असतात ; जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतात. सहसा मुळा सहसा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खाल्ला जातो. पण मुळ्याची एक टेस्टी रेसिपी सांगणार आहोत. तुमच्या जसे बटाट्याचे काप करता तसे मुळ्याचे कापही करू शकता. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडले. चला तर मग जाणून घेऊ या ही रेसिपी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा