Ragi Upma Recipe: आजपर्यंत तुम्ही रव्याचा उपमा, ओट्सचा उपमा नक्की खाल्ला असेल. पण आज आम्ही तुम्हाला नाचणीचा पौष्टिक उपमा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.
नाचणीचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी नाचणीचे पीठ
- ६-७ बारीक चिरलेल्या मिरच्या
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ छोटा चमचा जिरे
- १ छोटा चमचा मोहरी
- १ छोटा चमचा हळद
- ७-८ कढीपत्त्याची पाने
- कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
नाचणीचा उपमा बनवण्याची कृती :
हेही वाचा:फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी नाचणीला काही वेळ भिजवून मोड आणून वाफवून घ्या.
- त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कांदा, मिरची, कढीपत्ता घाला.
- आता त्यामध्ये शिजवलेली नाचणी घालून त्यावर पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.
- काही मिनिट हा उपमा परतून घ्या आणि त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.