Raksha Bandhan Mithai Recipes: रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक जण या सणानिमित्त गोड मिठाई खरेदी करत असतात. मात्र, अशा सणाच्यावेळी बाजारातील मिठाईत भेसळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशी मिठाई आरोग्यासाठी घातक ठरू शकते; म्हणून यंदा रक्षाबंधनाला बाहेरून मिठाई विकत घेण्याऐवजी घरीच बनवणे फायदेशीर ठरू शकते. रक्षाबंधनानिमित्त तुम्ही घरीच पारंपरिक मिठाई बनवू शकता. जसे की लाडू, पेढा आणि बर्फी. तुम्ही अगदी माव्याशिवाय घरीच ही मिठाई बनवू शकता.
रक्षाबंधनाच्या दिवशी घरीच बनवा ही तीन प्रकारची मिठाई (Mithai Recipes Burfi Ladoo Peda Recipe Without Mawa)
ड्रायफ्रुटसची बर्फी
बर्फी बनवण्यासाठी लोक अनेकदा माव्याचा वापर करतात. पण, यंदा तुम्ही रक्षाबंधनासाठी नारळाची बर्फी बनवू शकता. यासाठी सर्वात आधी नारळ किसून घ्या. मग त्यात थोडी वेलची पूड मिक्स करा, यानंतर साखरेच्या पाकात किसलेलं खोबरं घालून चांगले मिक्स करा. आता ताटात थोडे तूप लावून तयार मिश्रण त्यात पसरावा. नंतर थंड होऊ द्या आणि बर्फीच्या आकारात कापून घ्या.
माव्याशिवाय बनवा पेढा
पेढा बनवण्यासाठी दूध चांगले उकळून मग त्यापासून घट्ट मावा तयार करा. ड्रायफ्रुट्स बारीक करून त्यात थोडी साखर घाला. यानंतर थोडं थंड होऊ द्या आणि हाताला तूप किंवा पाणी लावून पेढा बनवा.
Read More Rakshabandhan Related News : Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन १८ की १९ ऑगस्टला? नक्की तारीख काय? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता? घ्या जाणून…
माव्याशिवाय बनवा बेसनाचे लाडू
बेसन आणि रवा घालून लाडू बनवू शकता. यासाठी प्रथम बेसन आणि रवा भाजून घ्या. यानंतर खजूर बारीक करून त्यात मिक्स करा. आता दूध उकळून त्यात साखर घाला आणि बेसन, रवा आणि खजूर घाला. यानंतर सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता मिश्रण थोडं थंड होऊ द्या आणि मग त्यापासून लाडू बनवा. यंदा रक्षाबंधनानिमित्त मिठाईचे हे तीन पदार्थ जरूर करून पाहा.