Raksha Bandhan Special Besan Barfi: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊरायाचे औक्षण करताना बाजारातील मिठाई विकत आणली जाते. पण सणासुदीच्या दिवसात बाजारातील मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात बेसळ असते. त्यामुळे अशावेळी बेसळयुक्त मिठाई खाण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी बेसन बर्फी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
बेसन बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ३ कप बेसन
- २ कप साखर
- २ कप तूप
- १ वाटी दूध
- २ चमचे वेलची पूड
- १ वाटी ड्रायफ्रुट्स
बेसन बर्फी बनवण्याची कृती:
हेही वाचा: सतत साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग बनवा ‘रताळ्याचा शिरा’; नोट करा साहित्य आणि कृती
- सर्वप्रथम कढईत तूप टाकून बेसन व्यवस्थित भाजून घ्या आणि बेसन थोडे लालसर होईपर्यत भाजून घ्या.
- आता बेसनाच्या मिश्रणात साखर मिक्स करुन घ्या.
- त्यानंतर या मिश्रणात साखर, दूध व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घाला.
- आता टीनला तूप लावून घ्या आणि त्यात बेसनाचे मिश्रण ओता.
- आता हे मिश्रण सर्व बाजूने एकसारखे करून घ्या.
- मिश्रण एकसमान केल्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्स घाला.
- मिश्रण सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेऊन द्या.
- वेळ पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर बेसनाच्या वड्या पाडून घ्या.
- तयार बेसन वडीचा आस्वाद घ्या.