Rakshabandhan Special RasMalai Sandwich : यंदा रक्षाबंधन हा सण १९ ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजेच उद्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. यादिवशी भावाला राखी बांधून त्याला गोड पदार्थ भरवला जातो. तर एखादा सण असेल तर आपण मिठीच्या दुकानातून विविध प्रकारच्या मिठाई घरी आणतो. यामध्ये लाडू, पेढे, काजू कतली आदींचा समावेश असतो. पण, जर यंदा काही वेगळं केलं तर ? म्हणजेच बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा आपण घरीच मिठाई बनवली तर… म्हणूनच आज आपण टेस्टी “रसमलाई सँडविच” ( RasMalai Sandwich) कसं बनवायचं हे पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊ या पदार्थाचे साहित्य व कृती…

साहित्य :

१. एक लिटर गाईचं दूध

Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

२. १/२ चमचा लिंबु रस

३. दीड किलो साखर

४. दोन रिठा (पर्यायी)

५. चिमूटभर हायड्रो पावडर

६. २५० ग्रॅम मावा

७. दोन चांदी वर्क

८. सहा बदाम

हेही वाचा…Masala Kaju: सतत भूक लागते? चिप्स खाण्याऐवजी घरीच करा ‘हा’ चटकदार पदार्थ; रेसिपी लिहून घ्या

कृती :

१. एक कप पाण्यात लिंबाचा रस मिसळवून वेगळे ठेवावे.

२. त्यानंतर दूध उकळावयाला ठेवा.

३. दूध उकळू लागल्यावर लिंबाचा रस हळूहळू दुधात टाकत जा.

४. दूध फाटलं की, लिंबाचा रस घालणे बंद करावे.

५. आता एका चाळणीत एक स्वच्छ सुती कपडे ठेवून त्यात ते फाटलेले दूध ओतून पाणी व चोथा वेगळा करावा हा चोथा परत साध्या पाण्याने धुवून काढावा फडके पिळून त्यातील पाणी काढून टाकावे.

६. आता पाणी काढलेला चोथा एका भांड्यात घेऊन, नीट मळून घ्यावे. नंतर हातावर वळून त्याचे लंबगोलाकार असे गोळे करून घ्यावेत.

७. एका भांड्यात एक लिटर पाणी, एक किलो साखर उकळवून घ्यावे. तर दुसऱ्या भांड्यात अर्धा लिटर पाणी, दोन रिठे उकळवून घ्यावे.

८. आता या दोघांना उकळी आल्यावर रिठ्याचे पाणी पाकात मिसळवून घ्यावे आणि त्यात लंबगोलाकार तयार करून घेतलेले गोळे टाका.

९. २० मिनिटानंतर गॅस बंद करावा. १५ ते २० मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवावे जेणेकरून गोळ्यांमध्ये पाणी जाऊन ते फुलतील.

१०. आता एका भांड्यात अर्धा किलो साखर, एक कप पाणी टाकून उकळवून घ्या. त्यात चिमूटभर हायड्रो पावडर पण मिसळून घ्या. २ ते ३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा.

११. लंबगोलाकार गोळे पाकातून काढून या नवीन पाकात टाका.

१२. थोडा वेळाने बाहेर काढा आणि मधोमध, आडवे कापून घ्या.

१३. आता एक कढई गॅसवर गरम करत ठेवून त्यात तूप घालावे तूप वितळले की त्यात दूध, क्रिम आणि नंतर मिल्क पावडर घालून एकसारखे ढवळावे, ढवळत असताना त्यात चिमूटभर वेलची पूड आणि थोड्याशा गरम दुधात केशर घालून ते या मिश्रणात घालावे, जेणेकरुन त्याला केशराचा रंग येईल. हे मिश्रण खव्याप्रमाणे घट्ट होईपर्यत ढवळत राहावे.मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा. (याला पर्याय म्हणून तुम्ही मावा किसून घ्या, त्यात थोडा पाक मिसळा आणि कापून घेतलेल्या लंबगोलंकार गोळ्यांच्या मधोमध भरा )

१४. मधोमध कापून तयार केलेलं गोळ्यांमध्ये तयार केलेला खवा भरावा. तुम्हाला आवडतील त्या ड्रायफ्रूट्स , टुटी-फ्रुटी लावून, चांदीचा वर्ख लावून सजवावे.

१५. एका डब्यात ठेवून तासभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे.

अशाप्रकारे आपलं रक्षाबंधन स्पेशल “रसमलाई सँडविच” (RasMalai Sandwich) तयार.