Sunthwada Recipe Video : रामनवमी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी प्रभू रामाची पूजा आराधना केली जाते. घरी अंगणात मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. रामाचे मंदिर सजवले जाते. या दिवशी भगवान रामाला खास नैवद्य दाखवला जातो. प्रसाद म्हणून सुंठवडा दिला जातो. पण तुम्हाला माहितीये का सुंठवडा कसा बनवतात? आज आपण त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

सुंठवडाचे फायदे (Benefits of Sunthwada Recipe)

सुंठवडा हा एक महाराष्ट्रीयन प्रसाद आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. सुंठवडा बनवताना वापरण्यात येणारे पदार्थ अत्यंत पौष्टिक असतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. केस, हाडांचे आजार, सांधेदुखी दूर करण्यासाठी सुंठवडा खाणे फायदेशीर मानले जाते. पचनक्रियेसाठी सुद्धा सुंठवडा चांगले आहे.

रामनवमीसाठी खास प्रसाद सुंठवडा (Ram Navami Special Sunthwada Recipe)

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

साहित्य

  • एक चमचा बडीशेप भाजून घ्या
  • चार चमचे खडीसाखर घ्या
  • अर्ध्या वाटी सुखं खोबरं किसून हलकं भाजून घेतलेले आहे.
  • दोन चमचे धणे थोडेसे भाजून घेतले आहे.
  • सुंठचे दोन तुकडे
  • दोन वेलची
  • सुका मेवा

कृती

  • सुरुवातीला सुंठेचे दोन तुकडे खलबत्त्यात बारीक करावे.
  • सुंठेचे पावडर वापरण्यापेक्षा अख्खी सुंठ वापरावी.
  • त्यानंतर सुंठ चाळून घ्यावी.
  • चाळलेल्या सुंठ पावडरमध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा किस टाकावा, त्यानंतर त्यात दोन वेलची, भाजलेली बडीशेप, धणे आणि खडी साखर एकत्र करावी आणि खलबत्यात नीट बारीक करावी.
  • त्यात तुमच्या आवडीनुसार सुका मेवा बारीक करून टाकावा.
  • पारंपारिक पद्धतीने सुंठवडा तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch viral recipe video)

आणि बरचं काही या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रामनवमीसाठी खास प्रसाद सुंठवडा”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रामनवमी मुहूर्त २०२५ (Ram Navami 2025 Muhurat)

हिंदू पंचांगानुसार ६ एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३९ पर्यंत राहील. पूजा मुहूर्ताचा एकूण कालावधी सुमारे दोन तास ३१ मिनिटे असेल.