महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी रसीली आलू गोभीची भाजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रसीली आलू गोभी साहित्य

१ लहान फुलकोबी
३ बटाटे
१ चमचा मोहरीचे तेल, हिंग
१/२ tsp मोहरी,
१/२ tsp जिरे
थोडी कढीपत्ता
१ टीस्पून आले,
१ tsp लसूण पेस्ट घाला
१ छोटा चिरलेला कांदा
१/२ tsp हळद
१ tsp धणेपूड घाला
२ चिरलेला टोमॅटो
१ ग्लास पाणी
१ चमचा किचन किंग गरम मसाला
कोथिंबीर

रसीली आलू गोभी कृती

प्रथम एक लहान फुलकोबी आणि तीन बटाटे चिरून घ्या आणि पाच मिनिटे उकळवा.

नंतर कुकर गरम करून त्यात एक चमचा मोहरीचे तेल घालून त्यात हिंग, मोहरी, जिरे आणि थोडी कढीपत्ता घाला.

दोन मिनिटांनंतर एक टीस्पून आले, लसूण पेस्ट घाला आणि एक छोटा चिरलेला कांदा घाला आणि हलवा नंतर हळद आणि धणेपूड घाला.

आणि एक मिनिटानंतर चिरलेला टोमॅटो घाला आणि पुन्हा मिक्स करा नंतर बटाटे आणि फ्लॉवर घाला, सर्वकाही चांगले मिसळा नंतर मीठ घाला.

नंतर त्यात एक ग्लास पाणी आणि एक चमचा किचन किंग गरम मसाला घालून कुकरचे झाकण लावा आणि एकच शिट्टी द्या. नंतर गॅस बंद करा.

हेही वाचा >> Naivedya Recipes: बाप्पाच्या प्रसादाला बनवा बदाम पोळी; सोपी रेसिपी लगेच नोट करा

पाच मिनिटांनी झाकण उघडा. भाजीला कोथिंबीर चिरून सजवा आणि पराठे आणि कोशिंबीरसोबत सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasili aaloo gobhi recipe in marathi flower vegetable recipe in marathi srk