रसमलाई नाव घेतल्यानंतर लगेच तोंडाला पाणी सुटलं ना. रसमलाई म्हंटलं की डोळ्यासमोर गोड दुधात बुडवलेले पनीर किंवा खव्याचे गोळे येतात.नेहमीच्या त्यात त्या मिठाई खाऊन कंटाळा आला असेल आणि झटपट काहीतरी वेगळं बनवायचं असेल या मिठाई ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनीर रसमलाई’ची साहित्य

  • १ लीटर दूध
  • ४ वाट्या साखर
  • १ कंडेन्सड मिल्कचा डबा
  • २ ते ३ कप सायीसकट दूध
  • ४-५ वेलदोड्याची पूड
  • थोडी केशराची पूड
  • १ टेबलस्पून मैदा

पनीर रसमलाई’ची कृती

  • १ लीटर दूध पितळेच्या पातेल्यात ठेवून उकळा.
  • उकळी आली की त्यात अर्धा लिंबाचा रस व अर्धा चमचा तुरटीची पूड घालून दूध नासवून घ्यावे.
  • दूध चांगले फाटले की उतरवा व गार झाले की कपड्यावर ओतून सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा.
  • पाणी गळायचे थांबले की काढून घ्या.
  • परातीत हे नासलेले दूध व मैदा एकत्र करुन खूप मळून घ्या. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करा.
  • एका उथळ पातेल्यात २ वाट्या साखरेत ४ वाट्या पाणी घालून कच्चा पाक करा.
  • पाकाला उकळी आली की त्यात वरील गोळे सोडा.
  • गोळे शिजले की चमच्याने अलगद काढून घ्या व ताटलीत ठेवून गार होऊ द्या.
  • एका भांड्यात कंडेन्सड मिल्कमध्ये दूध घालून सारखे करा.

हेही वाचा >> आजीच्या पद्धतीने अशी बनवा अळूची चवदार भाजी, फॉलो करा या स्टेप्स

  • वेलदोड्याची पूड व केशर घालून वरील गार झालेले गोळे सोडा. तयार आहे ‘पनीर रसमलाई’.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasmalai recipe with homemade paneer paneer rasmalai recipe in marathi srk