Ratalyachi Barfi Recipe In Marathi: रताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो.  रताळे अनेकदा उपवासाच्या दिवशी खाल्ल जातं. तसंच रताळ्याची भाजी, रताळ्याचा कीस, रताळ्याची खीर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण आज आपण रताळ्याची अशी एक रेसिपी बनवून पाहणार आहोत, जी सगळ्यांनाच आवडेल. खमंग खुसखुशीत रुचकर अशी ‘रताळ्याची बर्फी’ कशी बनवायची ते आपण आज जाणून घेऊ या… ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.

साहित्य

  1. 1/2 किलो रताळी
  2. 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस
  3. 2 वाटी साखर
  4. 1 वाटी घट्ट साय
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 1 टेबल स्पून बदाम काजू पिस्त्याचे काप
  7. 1/2 टेबलस्पून गुलाबाच्या पाकळ्या
  8. 1/2 चमचा मीठ
  9. टेबलस्पून साजूक तूप

कृती

प्रथम भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालावे व रताळी स्वच्छ धुऊन ती गॅसवर शिजवून घ्यावी म्हणजे ती जास्त शिजत नाहीत पाहिजे तेवढी शिजली की गॅस बंद करावा थंड करून त्याची सालं काढावी व मॅश करून ठेवावीत नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये तूप घालावे व उकडून, साल काढून मॅश रताळी घालून छान परतावे.

त्यामध्ये खोबऱ्याचा कीस घालावा तोही छान परतावा तो परतल्यावर त्यामध्ये साखर व साय दोन्ही घालून सारखं परत मिश्रण घट्ट होईपर्यंत मिडीयम गॅसवर परतत राहावे शेवटी वेलची पावडर व अर्धे ड्रायफ्रूट्स घालावे व छान एकजीव करावे

मिश्रण तूप सुटून गोळा होऊ लागलं की अजून दोन मिनिटांसाठी छान परतावे व तूप लावलेल्या ताटलीमध्ये थापून त्यावर ड्रायफ्रूट्स व गुलाबाच्या पाकळ्या घालाव्या व छान थापावे व छान सेट करावे सेट होण्यासाठी साधारण एक ते दोन तास लागतात लवकर हव असल्यास फ्रीजमध्ये ठेवावे मग त्याच्या वड्या पाडाव्या. अतिशय चविष्ट रुचकर अशी ही रताळ्याची बर्फी तयार होते जी तोंडात टाकताच विरघळते.

Story img Loader