Rava Appam : नियमित नाश्त्याला काय बनवावं, हा प्रत्येकाला पडतो. नेहमी नेहमी पोहे, इडली, उपमा किंवा डोसा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज आपण एक हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. अगदी दहा मिनिटांमध्ये होणारा रवा अप्पम हा हेल्दी आणि तितकाच टेस्टी असतो. रवा अप्पम कसा बनवायचा, चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • रवा
  • साखर
  • मीठ
  • दही
  • पाणी

हेही वाचा : Oats Dosa : असा बनवा कुरकुरीत पौष्टिक ओट्स डोसा; ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • एका पातेल्यात प्रमाणानुसार रवा घ्या.
  • त्यात थोडी साखर टाका
  • थोडे आंबट दही टाका
  • चवीनुसार मीठ टाका
  • आणि प्रमाणानुसार थोडे पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्र करा
  • हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
  • त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार थोडे फ्रुट मीठ टाका आणि चांगल्याने ढवळून घ्या.
  • त्यानंतर गरम तव्यावर हे मिश्रण टाका.
  • अप्पमचा आकार किती ठेवायचा, हे तुमच्यावर अवलंबून आहे, त्यानुसार तव्यावर मिश्रण पसरवा पण लक्षात ठेवा की अप्पम डोसासारखा पातळ नसतो.
  • कमी आचेवर अप्पमचा एकच भाग चांगला भाजून घ्या.
  • तेलाचा वापर न करता स्वादिष्ट आणि हेल्दी अप्पम तुम्ही बनवू शकता.
  • अप्पम तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rava appam recipe how to make instant rave appam in breakfast recipe news in marathi south indian dish ndj