दिवाळीचा फराळ खायला जितका चविष्ट असतो तितकाच तो बनवायला अवघड असतं. चिवडा, चकली, शंकरपाळ्या, करंजी हे सर्व पदार्थ बनवणे तसे अवघडचं आहे पण लाडू वळणे जरा किचकट काम आहे. विशेषत: पाकातले लाडू तयार करताना पाक थोडा जरी बिघडला तर लाडू कडक होतात किंवा बांधले जात नाही. म्हणूनच आम्ही बिनापाकातील रव्याचे लाडू कसे हे तुम्हाला सांगणार आहोत. तोंडात टाकताच विघळणारे हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत. चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी
पाकाशिवाय कसे बनवावे रव्याचे लाडू
बारीक रवा – ५०० ग्रॅम
पिठीसाखर – ४०० ग्रॅम
साजूक तूप – १२५ ग्रॅम
काजू बदाम पावडर – अर्धी वाटी
वेलची पावडर – १ चमचा
मनुके
हेही वाचा – Diwali Faral : विकतच्या सारखी कुरकुरीत, चटपटीत बाकरवडी खायची आहे? मग नोट करा सोपी रेसिपी
पाकशिवाय कसे बनवायचे रवा लाडू
सर्वप्रथम कढई गरम करून त्यात बारीक रवा एका चांगला भाजून घ्या.
त्यात साजूक तूप टाकून थोडावेळ मंद आचेवर परतून घ्या.
रवा एका ताटात काढून घ्या आणि त्यात पिठी साखर, काजू बदाम पावडर, वेलची पावडर आणि मोहन तेल टाका.
सर्व पदार्थ एकत्र करून घ्या आणि त्याचे लाडू वळा.
लाडू वळताना एक मनुका त्यामध्ये टाकून वळा.