शुभा प्रभू-साटम
दोडाक म्हणजे रव्याचा डोसा. पण हा डोसा जरासा जाड असतो. रवा डोशासारखा कुरकुरीत पातळ नसतो.
साहित्य
रवा, (बारीक नको) एक वाटी, दही एक मोठा चमचा, हिरवी मिरची चिरून आवडीनुसार, मीठ आणि किंचित साखर आवडत असेल तर तेलाची िहग आणि कढीपत्ता फोडणी करून ती ओतू शकता.
कृती
सर्व साहित्य एकत्र करा. पाणी घालून मऊ भिजवा. फोडणी घालणार असल्यास ती करून वरून ओता आणि कालवा. हे पीठ ओतायचे नाही तर थालीपीठाच्या पिठासारखे थापायचे आहे. नाहीच जमले तर वाटीच्या बुडाने थापा. तसे पीठ भिजवून थालीपीठ थापतो तसे थापून तापलेल्या तव्यावर लालसर होईपर्यंत दोन्ही बाजून भाजा. अनेकदा हे दोडक मोडायची भीती असल्याने आकार छोटय़ा पुरी एवढा ठेवा म्हणजे उलटवताना तुकडा पडत नाही. हवी तर कोथिंबीर / किसलेले गाजर घालता येते.